Share

वर्ल्डकप जिंकल्याबद्दल BCCI कडून भारतीय संघाला मिळणार बंपर गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार ४० लाख अन्…

अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून भारताने पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. भारतीय संघाच्या या जबरदस्त कामगिरीनंतर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विजेत्या संघाच्या सदस्यांना 40 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफसाठी २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत घोषणा केली आहे. (BCCI gave 40 lakh to each player)

तसेच क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघाने विजय मिळविल्यानंतर लगेचच ट्विट केले, अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करून विजेतेपद पटकावणाऱ्या अंडर-१९ संघाच्या सदस्यांना बीसीसीआयचे प्रत्येकी ४० लाख रुपये रोख बक्षीस आणि २५ लाख रुपये दिले जाणार आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

सौरव गांगुलीने ट्विट केले की, ‘अशा अप्रतिम पद्धतीने विश्वचषक जिंकल्याबद्दल अंडर-१९ संघ, सपोर्ट स्टाफ आणि निवडकर्त्यांचे अभिनंदन. आमच्याकडून ४० लाखांच्या रोख बक्षीसाची घोषणा ही कौतुकाची छोटीशी चिन्हे आहे, पण त्यांचे प्रयत्न मोलाचे आहेत.

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ ४४.५ षटकांत १८९ धावांत गारद झाला. जेम्स रियूने सर्वाधिक ९५ धावा केल्या.त्याचबरोबर जेम्स सेल्सने ३४ धावा करून नाबाद राहिला. सेल्स आणि रियू यांनी आठव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली.

मधल्या फळीतल्या फलंदाजांमुळे इंग्लंडचा संघ सन्मानजनक धावसंख्या उभारू शकला. भारताकडून राज अंगद बावाने पाच बळी घेतले. तर रवी कुमारने चार आणि कौशल तांबेने एक गडी बाद केला. तसेच प्रत्युत्तरात भारताने ४७.४ षटकांत ६ बाद १९५ धावा करून सामना जिंकला.

निशांत सिंधू आणि उपकर्णधार शेख रशीद यांनी अर्धशतके झळकावली आहे. तसेच राज बावाने ३५ आणि हरनूर सिंगने २१ धावांचे मोलाचे योगदान दिले. इंग्लंडकडून जोशुआ बॉयडेन, थॉमस स्पिनवॉल आणि जेम्स सेल्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

महत्वाच्या बातम्या-
१९८३ चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या खेळाडूंना द्यायला BCCI कडे नव्हते पैसे, तेव्हा लता दीदींनी दिले होते २० लाख
पत्नीचा काटा काढल्यानंतर स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये जाऊन केली बेपत्ता असल्याची तक्रार, असा झाला खुनाचा खुलासा
गरीबी लय वाईट! जन्मदात्या आईवर आली बाळाला विकण्याची वेळ आली; वाचा असं नेमकं काय घडलं?

खेळ

Join WhatsApp

Join Now