आयपीएल २०२२ ला आता काहीच महिने शिल्लक राहिले आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमी आतुरतेने आयपीएल सुरु होण्याची वाट पाहत आहे. तसेच यावेळी दोन नवीन संघ आले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण १० संघ आयपीएल खेळणार आहे. त्यामुळे सर्व संघांमध्ये मोठा बदल होताना दिसून येणार आहे. (bcci ban this player ban to bowling)
अशात आयपीएल २०२२ च्या लिलावापूर्वी बीसीसीआयने ३ खेळाडूंच्या गोलंदाजीवर बंदी घातली आहे. याशिवाय बीसीसीआयने अशा आणखी १० खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत, ज्यांच्या गोलंदाजीची क्रिया संशयास्पद आहे. हे सर्व खेळाडू संशयाच्या भोवऱ्यात सापडणार आहेत.
शनिवार आणि रविवारी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने जाहीर केलेल्या या यादीचा या खेळाडूंवर मोठा परिणाम होऊ शकतो. बीसीसीआयने कर्नाटकच्या मनीष पांडे, केएल श्रीजीत आणि झारखंडच्या इशांक जग्गी यांच्या गोलंदाजीवर बंदी घातली आहे.
मनीष पांडे आणि जग्गी यांनी लिलावात फलंदाज म्हणून स्वत:ची नोंद केली आहे, तर केएल श्रीजीत यष्टिरक्षक आहे. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीवर बंदीचा मोठा परिणाम होणार नाही. अजून १० खेळाडू असले तरी ज्यांच्या गोलंदाजीची क्रिया संशयास्पद आहे.
विकी ओस्तवाल आणि दर्शन नळकांडे ही त्यातली मोठी नावं आहे. तर विकी ओस्तवाल नुकताच अंडर-१९ विश्वचषक खेळला आहे. विश्वकपाच्या सामन्यांमध्ये त्याने १२ विकेट घेतल्या आहेत. विकीच्या या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने अंडर-१९ वर्ल्ड कपही जिंकला.
बीसीसीआयच्या यादीत विदर्भाचा वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडे याचेही नाव आहे. या वेगवान गोलंदाजाने अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सलग ४ चेंडूत ४ विकेट्स घेतल्या होत्या. गेल्या सिजनमध्ये दर्शनही पंजाब किंग्ज संघाचा भाग होता, तरीही त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.
बीसीसीआयने धर्मेंद्र सिंग जडेजा, अपूर्व वानखेडे, सुदीप चॅटर्जी, आर समर्थ, अर्पित गुलेरिया, जय बिस्ता आणि अझीम काझी यांच्या गोलंदाजीच्या ऍक्शनवरही लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे गोलंदाजांसोबतच संघावरही याचा परीणाम होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘बच्चन पांडे’ फेम अभिनेत्री क्रिती सेनॉनचा नवीन लुक व्हायरल, फोटो पाहून चाहते म्हणाले ‘परमसुंदरी’
अखेर ठरलं! ‘या’ कॉमेडी चित्रपटात प्रभाससोबत रोमांस करणार महरीन पीरजादा
महिलेच्या गालाचा चावा घेणाऱ्या आरोपीची न्यायालयाने केली निर्दोष सुटका, दंडाधिकारी म्हणाले..






