Share

T20 world cup : अखेर BCCI ने जाहीर केला टी-२० साठी भारतीय संघ; वाचा कोणत्या खेळाडूला मिळाली संधी

T20 world cup | 2022 च्या T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पुन्हा एकदा रोहित शर्मा संघाचा कर्णधार असणार आहे. पण अपेक्षेप्रमाणे बीसीसीआयच्या निवड समितीने काही धक्कादायक खेळाडूंचाही समावेश संघात केला आहे. संजू सॅमसन आणि मोहम्मद शमीला संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती, पण निवड समितीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

जवळपास त्याच खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, ज्यांच्या नावाचा अंदाज आधीच लावला जात होता. आशिया चषक स्पर्धेत खेळत असलेल्या टी-20 विश्वचषकासाठी संघात जास्त बदल करण्यात आलेले नाहीत. आवेश खान आणि रवी बिश्नोई यांना वगळण्यात आले आहे. रवी बिश्नोई मुख्य संघात नसला तरी त्याचा स्टँडबाय खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.

T20 विश्वचषक 2022 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल कुमार, अरशल पटेल सिंग.
स्टँडबाय खेळाडू: मो शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलचे पुनरागमन झाले आहे. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, त्याच्या जागी अक्षर पटेलला संघात ठेवण्यात आले आहे. आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाची कामगिरी काही खास नव्हती. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले होते आणि नंतर हाँगकाँगला पराभूत केले होते, परंतु त्यानंतर टीम इंडियाला पाकिस्तान आणि त्यानंतर श्रीलंकेकडून सलग दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर भारतीय संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला.

यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तानचा पराभव केला असला तरी त्यांच्या विजयाला काही अर्थ नव्हता. आशिया चषक 2022 ची खास गोष्ट म्हणजे टीम इंडियाला त्यांच्या चुका कळण्यास मदत झाली. यानंतर असे मानले जात होते की निवडकर्ते काही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. संघातही तेच पाहायला मिळाले.

2022 च्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामनाही पाकिस्तानसोबत होणार आहे. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तान संघाला पुन्हा आव्हान देणे सोपे नाही. भारताला आणखी मेहनत घेणे गरजेचे आहे. टी-20 विश्वचषकासाठी भारताला चांगली सुरूवात करणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या
..तर उदय सामंतांना जिवंत जाळू, नाना पटोलोंसमोरच कार्यकर्त्याची जाहीर धमकी
VIDEO : Sharad Ponkshe : समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय? शरद पोंक्षे म्हणाले…
मुंबई भाजपा नगरसेवकांचं टेन्शन वाढलं; सर्व्हेतून झाला मोठा खुलासा, पक्षनेतृत्व घेणार मोठा निर्णय?
ट्रॅफीकमध्ये अडकला डॉक्टर; आॅपरेशन थिएटरमधील रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी जे केलं ते पाहून तुम्हीही रडाल

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now