बाटा इंडियाच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना भरपूर पैसा मिळवून दिला आहे. कंपनीच्या शेअर्सने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना ७००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी काही वर्षांपूर्वी बाटा इंडियाच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले होते, आज ते पैसे ७३ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. (bata india share great returns)
कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २,२६१.६५ रुपये आहे. बाटा इंडियाचे मार्केट कॅप २४,७१५ कोटी रुपये आहे. बाटा इंडियाचे शेअर्स २१ मे २००४ रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर २५.९५ रुपयांच्या पातळीवर होते. कंपनीचे शेअर्स २८ मार्च २०२२ रोजी बीएसईवर १,९२८.७५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत.
कंपनीच्या शेअर्सने गेल्या १८ वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे ७२५० टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने २१ मे २००४ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे ७३.६९ लाख रुपये झाले असते.
३ मार्च २०१७ रोजी बाटा इंडियाचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर ४९७.८५ रुपयांच्या पातळीवर होते. २८ मार्च २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स १,९२८.७५ रुपयांवर आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअर्समधील पैसा ५ वर्षांत जवळपास ४ पट झाला आहे.
बाटा इंडियाच्या कंपनीत जर एखाद्या व्यक्तीने ३ मार्च २०१७ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कंपनीच्या शेअर्समध्येच राहू दिली असती, तर सध्या ही रक्कम ३.८७ लाख रुपये झाली असती.
बाटा इंडियाचे शेअर्स २ मे २००३ रोजी १२.१४ रुपयांच्या पातळीवर होते. २८ मार्च २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स १,९२८.७५ रुपये आहेत. जर एखाद्या व्यक्तीने २ मे २००३ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक चालू ठेवू दिली असती, तर सध्या हे पैसे १.५८ कोटी रुपये झाले असते.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ मुस्लिम व्यक्तीने लटकावला पशुपतिनाथ मंदिरात ३७०० किलोचा सर्वात मोठा घंटा, मोठे-मोठे इंजिनीअर झाले फेल
महाराष्ट्राच्या राजकारणात उडणार खळबळ, ५ राज्यांचे निकाल पाहून भाजप-आपमध्ये जाणार बडे नेते
“निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा वापर…”; भाजपा नेत्याने पक्षाला दिला घरचा आहेर