Share

“सदावर्तेंची जीभ हासडणाऱ्याला ११ लाख अन् जी महिला कामगार त्यांच्या हातात बांगड्या भरेल तिला ५ लाख”

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. हा हल्ला वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुन करण्यात आल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे या प्रकरणी ११० कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. (baramati worker on gunratna sadavarte)

आता राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणांवरुन गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध केला जात आहे. असे असतानाच आता बारामती टेक्स्टाईल पार्कचे कामगार तुकाराम चौधर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जो कोणी सदावर्तेंची जीभ हासडेल त्याला ११ लाख रुपये बक्षीस देईल, असे तुकाराम चौधर यांनी म्हटले आहे.

जो कोणी गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडेल त्याला मी माझ्या वतीने ११ लाख रुपयांचे बक्षीस देईल. तसेज ज्या कामगार महिला त्या गुणरत्न सदावर्तेच्या हातात बांगड्या भरेल, तिला मी ५ लाखांचे बक्षीस देईल, अशी घोषणा तुकाराम चौधर यांनी केली आहे.

गुणरत्न सदावर्ते हा माणूस विविध कामगार संघटनांमध्ये शिरुन कामगारांपुढे संकट निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यातूनच जेष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला, असेही तुकाराम चौधर यांनी गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करताना म्हटले आहे.

तसेच यावेळी त्यांनी बारामतीत होणाऱ्या आंदोलनाबाबतही प्रतिक्रिया दिली. सदावर्ते म्हणाले होते की १२ एप्रिलला बारामतीत शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करु.पण सदावर्ते आणि त्यांच्या मनोवृत्तीच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही बारामतीत येऊन तर पहा आम्ही त्याचीच वाट पाहत आहोत, असा इशारा तुकाराम चौधर यांनी दिला आहे.

दरम्यान, सिल्वर ओकवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. सध्या त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतू त्यानंतर त्यांना सातारा पोलिस अटक करण्याच्या तयारीत आहे. तसेच कोल्हापूर, अकोला याठिकाणीही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
१५ वर्षात अखंड भारत होईल म्हणणाऱ्या भागवतांना राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
हा कुंभकर्ण २० वर्षांपासून झोपला होता का? जेम्स लेनच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड भडकले
‘शूटिंग संपलं की मला सेटवरून हाकलून लावतात’, ‘जीव माझा गुंतला’मधील अभिनेत्रीचा मोठा खुलासा

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now