त्रिपुराच्या सिपाहिजाला जिल्ह्यात एका मुलाला लष्कराच्या जवानांनी पकडल्यामुळे त्या भागात खळबळ माजली आहे. या मुलाला भारतीय जवानांनी अटक केली असून लवकरच त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मुलाने भारतात येण्याचे अतिशय विचित्र कारण सर्वांना सांगितले आहे. हे कारण ऐकून सर्वजण चकित झाले आहेत.
भारतीय जवानांनी ताब्यात घेतलेल्या मुलाचे नाव इमाम हुसैन असून तो भारतात वैध कागदपत्रांशिवाय दाखल झाला आहे. चौकशी केल्यानंतर हा मुलगा रोज भारतात सीमेवरील काटेरी तारांखालून येत असल्याची माहिती जवानांना मिळाली आहे. मुख्य म्हणजे, त्याच्यासोबत इतर मुले देखील भारतात येत असल्याचे तपासातून समोर आले आहे.
इमान हुसैनने जवानांना सांगितले आहे की, तो बांगलादेशातील रहिवासी आहे. तो रोज त्रिपुरातील कलामचौरा गावात नदी ओलांडून येत असतं. त्याला भारतातील चॉकलेट खूप आवडत असे त्यामुळे तो सर्व जवानांची नजर चुकवून भारतात येतं. चॉकलेट घेतल्यानंतर तो आल्या त्या मार्गी परत घरी जात असे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर इमान हुसैन सत्य बोलत असल्याचे उघडकीस आले आहे. हुसैनसोबत इतर मुले देखील अशा पद्धतीने भारतात फक्त चॉकलेट घेण्यासाठी येत असल्याचे कलामचौरा गावातील दुकानदाराने सांगितले आहे. हुसैनकडे इतर काहीही संशयास्पद न आढळल्यामुळे त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
भारतात चुकीच्या पद्धतीने आल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सोनमुरा एसडीपीओ यांनी दिली आहे. सध्या हुसैन स्थानिक पोलिसांच्या ताब्यात आहे. हुसैनसोबत इतर कोणती मुले भारतात येत असत याचा तपास पोलिसांनी करण्यास सुरूवात केली आहे. या घटनेनंतर भारतीय सीमेलगदची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
प्रसिद्ध अभिनेत्याने रिअँलिटी शोमध्ये अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्टला केला स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“चुकीचा इतिहास मांडणाऱ्या विकृत व्यक्तीच्या प्रेमात अडकल्यामुळे राज ठाकरे संभ्रमित झाले आहेत”
मशिदीजवळ भोंगे लावून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याला होणार ‘ही’ कडक शिक्षा; पोलीस आयुक्तांनी काढले आदेश
“हिंदूंनो चार मुलांना जन्म द्या, त्यातील दोन संघ आणि विश्व हिंदू परिषदेला द्या”