Share

ठाकरेंनीच चूक केली, ते मुख्यमंत्री झाले नसते, आदित्यला मंत्री केले नसते तर…; ठाकरे गटातील खासदाराची थेट टिका

Uddhav Thackeray

गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत भाजपाच्या साथीने वेगळी चुल मांडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचत शिंदे यांनी भाजपाच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. यादरम्यान, ठाकरे गटात नाराजी पसरली. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठाकरे कुटुंबातील दोन मंत्री झाल्यामुळे बापानंतर पोरगा आमच्या बोकांडी बसतो की काय? यापेक्षा आपणच वेगळी चूल मांडलेली बरी, या भूमिकेतून ही बंडखोरी झाली आहे. असं स्पष्ट मत बंडु जाधव यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीची सत्ता असताना अडीच वर्षे आमचा लाभ व्हायला हवा होता. तो झाला नाही. तो काळ फुकट वाया गेला. याचा दुःख देखील बंडू जाधव (Bandu Jadhav) यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर त्यांनी आदित्य ठाकरे यांना मंत्री करायला नको होतं. बाप आणि मुलाने दोन खुर्च्या आठवल्या. त्यामुळे पक्ष संघटनेकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ उरला नाही. त्यावेळी कोणाला तरी पक्षाचे अधिकार द्यायला हवे होते. ते झाले नाही म्हणून चोरांनी संधी साधली, असं म्हणत जाधव यांनी थेट एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन आठ महिने उलटून गेली आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. निवडणूक आयोगाने नुकताच निकाल जाहीर केला आणि शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी विरोध करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली व आव्हान केले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे रस्त्यावर देखील उतरले आहेत. शिवगर्जना मेळावा प्रत्येक जिल्ह्या जिल्यात पार पडत आहे. याच मेळाव्यात परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर केला.

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवगर्जना अभियानाचे नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रात खासदार संजय राऊत पाहत आहेत. तर दुसरीकडे सुषमा अंधारे या मोर्चा सांभाळण्याचं काम करत आहेत. जाधव यांनी शिवसेनेच्या मंचावरून बंडखोरीचे कारण सांगितले आहे. त्यामुळे बंडू जाधव देखील पक्षांतराच्या वाटेवर आहेत की काय? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात धुडगूस घालत आहे.

महत्वाच्या बातम्या
दूधधंद्यात कमावला बक्कळ पैसा; आज आहे १०० म्हशी आणि १०० एकर जमीनीचा मालक, वाचा यशोगाथा..  
आम्ही तर रामकृष्णाचे वंशज, धर्मांतरनंतरही आमचे रक्त हिंदुचेच; मुस्लिम आमदाराचे विधानसभेत जोरदार भाषण
आशेने लावला कांदा अन् झाला वांदा! १७ गोण्या कांदा विक्रीनंतर १ रुपये नफा; उत्पादन खर्चही निघेना  

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now