महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे. औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर १ मे रोजी सभा घेण्याची घोषणा मनसेने केली होती. आता या सभेला परवानगीही मिळाली आहे. (bala nandgaonkar criticize shivsena)
अशात मनसे आणि सत्ताधारी नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला, तर तिथे एमआयएमचा खासदार कसा निवडून आला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. जर बालेकिल्ला आहे. तर मग एमआयएमचा खासदार कसा निवडून येतो? असा प्रश्न बाळा नांदगावकर यांनी विचारला आहे. औरंगाबादमध्ये मनसेची सभा होत आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते बोलत होते.
तसेच एवढी वर्षे महापालिका तुमच्या ताब्यात असताना काय केले? अजूनही पाण्यासाठी हंडा मोर्चा काढावा लागतो हे दुर्देव आहे. सभा ही कोणाचे रेकॉर्ड मोडण्यासाठी नसते, तर सभा हे विचारांचे सोने लुटण्यासाठी असते, असा टोलाही बाळा नांदगावकरांनी शिवसेनेला लगावला आहे. संजय राऊतांनी मनसेवर टीका केल्यानंतर त्यांना नांदगावकरांनी उत्तर दिले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत जे बोलतायेत, त्यावर त्यांनी त्यांची भूमिका पाहावी. पण जवळच्या माणसावर टीका नाही केली तर कसे होणार? असा टोलाही बाळा नांदगावरकरांनी लगावला आहे. तसेच आम्ही शांत बसूनही आमची प्रसिद्धी होते. जर आमच्या भूमिका बदलत असतात, तर दखल का घ्यावी लागतेय, असे बाळा नांदगावकरांनी म्हटले आहे.
तसेच मनसे आणि भाजप युतीवर मी बोलणार नाही, राज साहेबांची सगळ्यांशीच जवळीक आहे. त्यामुळे यावर राज ठाकरे अधिक बोलतील, असे बाळा नांदगावकरांनी म्हटले आहे. दरम्यान, औरंगाबादच्या सभेसाठी राज ठाकरे शनिवारी सकाळी पुण्यातून रवाना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
लता मंगेशकरांच्या ‘त्या’ गाण्याबाबत दिली चुकीची माहिती, तारक मेहताच्या टीमने मागितली माफी
‘Avatar 2’ च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी आणि ‘इथे’ पाहायला मिळणार चित्रपटाचा ट्रेलर
राज ठाकरेंच्या सभेविरोधात याचिका करणाऱ्याला न्यायालयाचा दणका, १ लाखांचा दंड ठोठावत म्हणाले..