काही दिवसपूर्वी शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. (bachchu kadu denies allegations of financial misconduct criticism of the vanchit bahujan aghadi)
तक्रार आल्यानंतर भगतसिंह कोश्यारींनी सर्व कागदपत्रांची तपासणी करुन बच्चू कडूंविरोधात खटला चालवण्याचे आदेश शनिवारी दिले. त्याबाबतची माहिती वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली. यावर आता शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना कडू यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘पुंडकर यांना वेगळ्या चष्म्याची गरज आहे. पुंडकरांनी बाळापूर येथील पंचशिल संस्था हडप केलीय. ते वंचित सोबत राहून दलितांवर अन्याय करतात. वंचितच्या गृहमंत्र्याला बाहेर काढा, असा सल्लाही कडू यांनी आंबेडकरांना दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मी एक रुपया जरी खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल,’ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून तक्रार करण्यात आलेल्या रस्त्याची कडू यांनी पाहणी केली आहे. पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचंही नाव या प्रकरणात समोर आलं आहे. काही इतर जिल्हा मार्ग आणि ग्राम मार्ग हे शासन क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामाची यादी जिल्हा परिषदेला पाठवून बच्चू कडू यांनी सरकारी निधीचा अपहार केल्याचं समोर आलं.
तसेच वंचित बहुजन आघाडीकडून तक्रार करण्यात आलेल्या रस्त्याची कडू यांनी पाहणी केली आहे. अकोट तालुक्यातील कुटासा ते कावसा असा हा रस्ता आहे. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी धैर्यवर्धन पुंडकर यांच्यावर जोरदार टीका केली. सध्या या प्रकरणावरून कडू हे अडचणीत आल्याचे समजत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा अजबच हट्ट; ‘माझ्या कुत्र्याची सुटका करा तरच मी भारतात येईल’
बलात्काराच्या आरोपानंतर नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात FIR दाखल; वाचा काय आहे प्रकरण
महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अधिकाऱ्याने महिलेवर केला बलात्कार; महाराष्ट्र हादरला
उल्हासनगरच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे भयानक कृत्य; २९ वर्षीय महिलेला लॉजवर नेले अन्…