राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यावरुन आणि हनुमान चालिसेवर वाद सुरु आहे. त्यामुळे राज्यात सत्ताधारी पक्ष विरुद्ध मनसे आणि भाजप असे चित्र पाहायला मिळत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले होते. (bachchu kadu criticize ravi rana)
राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर या वादाला सुरुवात झालेली दिसून आली. भाजपनेही मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. अशावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान देताना दिसून येत आहे.
राणा दाम्पत्या मुंबईत दाखल झाले आहे. तसेच त्यांनी आज सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या आव्हानामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या मातोश्रीवर येण्यावर बच्चू कडू यांनी त्यांच्यावर जाहीर टीका केली आहे. निवडणूकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता आणि आता तुमचा बाप बदलला आहे, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला सुनावलं आहे.
निवडणूकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता आणि आता तुमचा बाप बदलला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन राणा निवडून आले आहेत, हे त्यांनी विसरु नये. रवी राणा आणि नवनीत राणा विकासाचा मुद्दा सोडत आहे. आम्ही शिवसैनिकांसोबत आहोत. रवी राणांची तेवढी उंची नाही, ते मातोश्रीवर जाणार नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शनिवारी कोणत्याही परिस्थितीत हनुमान चालिसा वाचणार आहोत. शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर आम्ही जाणार आहोत. बाळासाहेब असते तर एक नाही तर १०० वेळा हनुमान चालिसा वाचण्याची परवानगी दिली असती, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडवू देणार नाही, असेही रवी राणा यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुंबई संघाच्या निराशाजनक कामगिरीवर सचिनने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, गेल्या वर्षातील..
डिव्हिलीअर्सने दिनेश कार्तिकला मिस्टर ३६० डिग्री म्हणून केले घोषित, म्हणाला, तो मला परत…
आरारारा खतरनाक! मुलीसाठी सजला होता मंडप, बापानेच केलं तिसरं लग्न, वाचून अवाक व्हाल