Share

शिंदे गटाला किती आमदारांचं किती समर्थन? बच्चू कडूंनी सांगीतला नेमका आकडा

bachchu kadu

आता खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना प्रचंड मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. शिवसेनेने आपल्या हालचाली वाढवल्या आणि इतर आमदारांना सुरत येथे जाण्यापासून रोखले. त्यातच दुसरीकडे  एकनाथ शिंदे आमदारांसह गुजरातहून आसामला दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे, बंडखोर आमदार, त्यांचे पीए असे एकूण ६५ जण असल्याची माहिती आहे. या बंडखोर आमदारांसोबत ‘प्रहार’चे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू देखील आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर बच्चू कडू यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला फोवरून माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं आहे की, ‘मी स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. ‘मी राज्यसभा आणि विधान परिषदेलाही तुम्हाला मतदान केलं. पण अचानक हे वातावरण तयार झालं आणि मी आज इथं आहे असं त्यांना मी फोवर सांगितलं असल्याच कडू यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

तसेच मुख्यमंत्र्यांनी ‘तुम्ही परत या..’ असं आवाहन केलं. पण तोवर सगळं पाणी डोक्यावरुन गेलं आहे”, असं कडू स्पष्टच सांगितलं. याचबरोबर सर्व  आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत, असे देखील कडू यांनी सांगितलं आहे. याचबरोबर शिंदे यांच्या गटाला असलेलं समर्थन हे ५० आमदारांपर्यंत पोहोचेल असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय.

दरम्यान, शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन शिंदे पहाटे सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहे. तसेच शिंदे यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचे म्हटले असून शिवसेनेने निवडलेला गटनेता हा घटनाबाह्य असल्याचेही म्हटले आहे. या आमदारांना रात्रीच चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यपालांची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे. मात्र असे असतानाच राज्यपालांना झालेली कोरोनाची लागण चर्चेचा विषय बनला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
आमची नाराजी उद्धव ठाकरेंवर नव्हे तर…; बंडखोर शिवसेना आमदाराने स्पष्टच सांगितलं
शिवसेनेला खिंडार! माझ्यासोबत ४० आमदार, आणखी १० सामील होणार; वाचा शिंदे काय काय म्हणाले
आदित्य ठाकरे मंत्रीपदाचा राजीनामा देणार; ‘त्या’ कृतीतून दिले स्पष्ट संकेत
‘गुजरातमध्ये जरूर दांडिया खेळा, पण महाराष्ट्रात तलवारीला तलवार भिडेल’ शिवसेनेचा एकनाथ शिंदें गटाला इशारा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now