Bachhu kadu | शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू हे देखील आपल्या आक्रमक स्वभावाने ओळखले जातात. अनेकदा कडू हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता पुन्हा ते चर्चेत आले होते. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता.
अनेकदा कडू यांची विधानं वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलेली आपण पाहिली आहे. पण दोन दिवसांपुर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे बच्चू कडूंवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओत पाहायला मिळत आहे की, बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानाखाली मारतात.
या व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एका कडू हे चांगलेच चर्चेत आले होते. अमरावती जिल्ह्यातील गणोजा गावातील ही घटना होती. गावातील विकास कामाच्या मुद्यावरुन वाद झाला होता. तेव्हा ‘ऐकून घे आधी, शांत बस!’, असं म्हणत बच्चू कडू एका व्यक्तीला कानाखाली मारताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बच्चू कडू अडचणीत आले होते. पण आता गावातल्या त्या कार्यकर्त्याने आणि बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सौरभ इंगोले असे त्या कार्यकर्त्याचे नाव आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांनी माध्यमांसमोर सर्व घडलेली हकीकत सांगितली आहे.
यावेळी बच्चू कडू म्हणाले की, बातमीच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या व्हिडीओचा चुकीचा वापर करण्यात आला. तसंच मी फक्त थांब म्हणालो होतो, मारहाण केलीच नव्हती. कार्यकर्त्यांसोबत आमचं कौटूंबिक नातं आहे, असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं आहे.
तर व्हिडीओमध्ये दिसत असलेला कार्यकर्त्यानेही आपली बाजू मांडली आहे. त्याने बच्चू कडूंचा बचाव केला. तो म्हणाला की, बच्चू कडू मला फक्त थांब म्हणाले. समोरचा व्यक्ती ऐकत नव्हता. त्यांनी माझ्या कानाखाली दिली नाही. दुसऱ्याला खोटी प्रसिद्धी हवी होती म्हणून व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला, असा खुलासा सौरभ इंगोले या कार्यकर्त्याने केला आहे.
महत्वाच्या बातम्या
Beautiful Hideouts : भारतातील ‘ती’ ७ सुंदर ठिकाणे जिथे गेल्यानंतर विदेशात गेल्याची येईल फिलींग, पहा मोहक फोटो
jackfruit tree : ‘या’ २०० वर्षे जुन्या फणसाच्या झाडासमोर IAS-IPS होतात नतमस्तक, पाहण्यासाठी लोक करतात गर्दी
health : रोगापेक्षा इलाज भयंकर! वेदनाशामक गोळी घेणं जीवावर बेतू शकतं, काय आहेत दुष्परिणाम?
shinde : मुख्यमंत्री होण्यामागे कुणाची कृपा? शिंदेंनी राजकीय नेत्याचं नव्हे तर ‘या’ व्यक्तीचे घेतलं नाव, अनेकांच्या भुवया उंचवल्या