गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर भाजप नेते गंभीर आरोप करताना दिसून येत आहे. तसेच त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे ऑडिओ क्लिपही व्हायरल केले जात आहेत. असे असताना आता भाजपच्या एका आमदाराच्या शिवीगाळाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. (babanrao lonikar audio clip viral)
नोटीस न देता थकीत वीज बिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत आमदार बबनराव लोणीकरांनी संताप व्यक्त केला आहे.यावेळी त्यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केली आहे. तसेच आयकर विभागाची धाड टाकून निलंबित करेल, अशी धमकीही दिली आहे. आता याप्रकरणी नितीन राऊत यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
बिल भरलं तरी मीटर का काढून नेलं? हिंमत असेल तर झोपडपट्टीत जाऊन मीटर काढा, असेही बबनराव लोणीकरांनी कर्मचाऱ्याला धमकी देताना म्हटले आहे. आमदार लोणीकर हे जेव्हा दादासाहेब काळे या महावितरणच्या कर्मचाऱ्याला बोलत होते, त्यावेळी त्यांनी शिवीगाळही केला आहे.
आमदार बबनराव लोणीकरांच्या घरावर तीन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असल्याची माहिती होती. त्यामुळे महावितरणने त्यांच्या घराचे मीटर कट केले. हे समजताच बबनराव लोणीकरांनी दादासाहेब काळे या कर्मचाऱ्याशी संपर्क साधून त्याला शिवीगाळ केली. हा ऑडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आता याप्रकरणी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आमदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यासोबत बोलताना वापरलेल्या भाषेबद्दल नितीन राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर त्यांनी बबनराव लोणीकरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहे. तसेच ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली आहे, त्या अधिकाऱ्याला गरज पडल्यास पोलिसांचे संरक्षणही देऊ, असेही नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पेट्रोल, डिझेल नाही, तर हायड्रोजन कार घेऊन गडकरी थेट पोहचले संसदेत; म्हणाले, आत्मनिर्भर भारतासाठी…
सोबत जगण्यामरण्याची वचने देणाऱ्या प्रेयसीने शेवटच्या क्षणी केला गेम; विष पिलेल्या प्रियकराला जागीच सोडून गेली पळून
भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान, म्हणाला, हलाल मांस म्हणजे आर्थिक जिहाद; हिंदूंना केले ‘हे’ आवाहन