महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. अनेक नेते शिंदे गटात सामिल होत आहेत. त्यामध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेत्यांचाही समावेश आहे.
आता शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले आमदारही शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. जर ते शिंदे गटात गेले तर शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी हा गौप्यस्फोट केला. परभणी जिल्ह्यात ४० सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यानंतर सईद खान म्हणाले की, बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. परभणी जिल्ह्यात शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार संघर्ष पहायला मिळाला आहे.
दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जात आहे आणि आता राष्ट्रवादीचेच आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे. सईद खान यांच्या खुलासानंतर परभणीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले बाबाजानी यांचे नाव पुढे आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर बाबाजानी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आपण शरद पवार यांचे समर्थक असून कायम त्यांच्याकडेच राहणार. आपण कट्टर शरद पवार समर्थक आहोत असा दावा त्यांनी केला आहे.
दावे प्रतिदावे रोज केले जात आहेत पण नक्की खरं काय आहे हे येणारा काळच सांगेल. दरम्यान, ठाण्यातही शिंदे गटाने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यातील काही नगरसेवक लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशी माहिती समोर आली होती.
महत्वाच्या बातम्या
ऊस तोड मजूर नवरा-बायकोने इन्स्टावर शेअर केलं रील, रातोरात झाले स्टार, कमेंट्स लाईक्सचा पाऊस
शाहरूख जोमात बॉयकॉट गँग कोमात! पहिल्याच दिवशी पठाणची रेकॉर्डब्रेक कमाई, आकडा वाचून शाॅक व्हाल
मंत्रिमंडळात विस्तारात शिंदे गट अन् भाजपमधील ‘या’ नेत्यांची लागणार वर्णी, दिल्लीत झालं शिक्कामोर्तब?
सामन्याच्या एक दिवस आधी अष्टपैलू रवींद्र जडेजाची अचानक संघात एन्ट्री, कर्णधारपदही मिळाले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण






