Share

Baba Venga: बाबा वेंगा यांनी भारताबाबत केली भयानक भविष्यवाणी; यंदा देशावर येणार ‘हे’ मोठं संकट

baba venga

बाबा वेंगा(Baba Venga): बल्गेरियात १११ वर्षांपूर्वी जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. वयाच्या १२ व्या वर्षी वादळात बाबा वेंगा यांची दृष्टी गेली. पण आजही बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाणीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मृत्यूपूर्वी, बाबा वेंगा यांनी २०२२ आणि त्यानंतरच्या वर्षासाठी अनेक महत्त्वपूर्ण भविष्यवाण्या केल्या आहेत.

बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार, २०२२ मध्ये भारतात टोळांचा हल्ला होऊ शकतो. याशिवाय दुष्काळासारख्या समस्याही येऊ शकतात. बाबा वेंगा यांनी २०२३ मध्ये पृथ्वी आपली कक्षा बदलेल असे भाकीत केले होते. याशिवाय २०२८ मध्ये अंतराळवीर शुक्र ग्रहावर जातील, असेही भाकीत त्यांनी केले होते. बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, २०४६ मध्ये मानव अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात मोठी प्रगती करेल आणि लोक त्याच्यासोबत १०० वर्षांपेक्षा जास्त जगू शकतील.

बाबा वेंगा यांनी २०२२ सालासाठी वर्तवलेले दोन अंदाज खरे ठरले आहेत. बाबा वेंगा यांनी आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पुराची भविष्यवाणी केली होती जी खरी ठरली आहे. ऑस्ट्रेलिया, ईशान्य भारत, बांगलादेश आणि थायलंडमध्ये पुराचा उद्रेक दिसून आला आहे. याशिवाय पाकिस्तानात पुराचा कहर सुरूच आहे.

बाबा वेंगा यांनी युरोपातील दुष्काळाच्या समस्येबद्दल भाकीत केले. यावर्षी पोर्तुगाल, युरोपमध्ये सरकारने आपल्या नागरिकांना पाण्याचा वापर मर्यादित करण्यास सांगितले. याव्यतिरिक्त, इटलीमध्ये सध्या १९५० नंतरच्या सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

बाबा बेंगा यांचा जन्म १९११ साली बल्गेरियात झाला आणि वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांचे दोन्ही डोळे गेले. त्या पाहू शकत नव्हत्या, परंतु असा दावा केला जातो की, देवाने त्यांना दिव्य दृष्टी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा बेंगा एका चक्रीवादळात हरवल्या होत्या आणि जेव्हा त्या सापडल्या तेव्हा त्यांचे डोळे वाळू आणि धुळीने झाकलेले होते.

मिळालेल्या माहितीवरून, त्यांचे कुटुंब फार गरीब होते आणि त्यांच्याकडे उपचारासाठीही पैसे नव्हते, यामुळे त्यांच्यावर उपचार करता आले नाही. बाबा वेंगा यांचे १९९६ मध्ये निधन झाले आणि त्यापूर्वी त्यांनी अनेक मोठे भाकीत केले होते.

महत्वाच्या बातम्या
Youtube: ‘या’ गावातील १ हजार लोकं युट्यूबच्या जीवावर कमावतात प्रचंड पैसे; वाचा भन्नाट स्टोरी
Eknath Shinde : १२ आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; आता महाविकास आघाडी काय करणार?
Ajit Pawar : बबनराव पाचपुतेंना पाडायला अजित पवारांनी खेळला गेम; ‘या’ बड्या नेत्याला उतरवणार रिंगणात
‘पैशांसाठी धर्मही विकला’; गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे सारा अली खान झाली ट्रोल

इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now