Share

…आणि आयुक्तांना पाहून फुल विक्रेत्या महिलेचा मुलगा म्हणाला, ‘ए आई उठ ना गं, बघ सर आलेत’

खाकी वर्दीच्या आतमध्येदेखील एक माणूस दडलेला असतो याचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. एका सर्वसामान्य गोरगरीब फुलविक्रेत्या महिलेच्या अंत्ययात्रेस नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्या फुलविक्रेत्या महिलेच्या मुलाने “ए आई उठ ना गं… सर आलेत तुला बघायला, बघ… ” अशा शब्दांत भावनाविवश होऊन दारावर आलेल्या पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या गळ्यात पडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

नाशिकमधील सातपूरच्या शिवाजीनगर भागात असलेल्या कोळीवाड्यात जिजाबाई रामदास पुराणे ( ६५ ) राहत होत्या. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी घरी जाऊन त्यांची विचारपूस केली होती. शुक्रवारी रात्री जिजाबाई पुराणे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पोलीस आयुक्त पांडेंनी कोळीवाड्यात जाऊन त्यांच्या मुलाची भेट घेतली आणि त्याचे सांत्वन केले.

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे शासकीय निवासस्थान महात्मानगर परिसरात आहे. याच भागातील रस्त्याकडेला जिजाबाई फुलविक्रीचा लहानसा व्यवसाय करत होत्या. पोलीस आयुक्त दीपक पांडे दररोज त्यांच्याकडून पूजाविधीकरता फुले विकत घेत असत. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे आणि जिजाबाई यांच्यात एक भावनिक नाते तयार झाले होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने जिजाबाईंनी फुलविक्री करणे थांबवले होते.

त्या ठिकाणी त्यांचा मुलगा फुले विकत असे. त्यांच्या मुलाकडे पांडेनी चौकशी केली असता जिजाबाईंच्या प्रकृतीबद्दल त्यांना माहित पडले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी जिजाबाईंच्या घरी जाऊन अर्धा-एक तास थांबून त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली. आर्थिक खर्चाची काळजी करू नका, असा आधार देखील दीपक पांडे यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिला.

दुर्देवाने शुक्रवारी सकाळी जिजाबाई यांचे निधन झाले. निधनाची बातमी समजताच पोलीस आयुक्त पांडे त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी जिजाबाईंच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. दीपक पांडेंनी जिजाबाईंच्या मुलाचे सांत्वन केले. “कुठलीही मदत लागल्यास सातपूरचे पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्याकडे निरोप देत जा”, असे सांगून पोलीस आयुक्त दीपक पांडेंनी जिजाबाईंच्या मुलाला धीर दिला.

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी जिजाबाईंच्या अंत्ययात्रेत देखील सहभाग घेतला. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची ही आपुलकी पाहून कोळीवाड्यातील सर्व रहिवाशांना गहिवरून आले. या घटनेवरून समस्त नाशिककरांना पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय आला आहे.

महत्वाच्या बातम्या:-
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! विशाल निकमने विकास पाटीलसोबत घेतले ज्योतिबाचे दर्शन, पहा फोटो
डिजे वाजवताना सुचली भन्नाट आयडीया, आता कमवतोय करोडो रुपये
‘या’ ॲपने मुस्लिम महीलांचे अश्लील फोटो अपलोड केल्याने शिवसेना नाराज; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

राज्य

Join WhatsApp

Join Now