पुढील महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणूक पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही निवडणूक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या विधानसभा मतदारसंघातून लढणार नसून गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील १०५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने पहिल्या टप्प्यातील ५८ जागांपैकी ५७ जागेवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही निवडणूक गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यापूर्वी विधानसभेची निवडणूक अयोध्येतून लढणार होते. मात्र अचानक त्यांना गोरखपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतून निवडणूक लढवली असती तर त्याचा प्रभाव इतर ६० जागांवर पडला असता. पण योगी हे मूळचे गोरखपूरचे असल्याने त्यांच्यासाठी हा मतदारसंघ निवडण्यात आला आहे, असे भाजपच्या नेत्याने सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य सिराथमधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. भाजपने उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह यांनाही तिकीट दिलं आहे. याव्यतिरिक्त देशाचे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह यांनादेखील उमेदवारी देण्यात आली आहे.
आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी योगी सरकारचे कौतुक केले आहे. “योगी आदित्यनाथ यांचे सरकार उत्तर प्रदेशमध्ये आल्यानंतर राज्यात एकही दंगल झाली नाही. राज्यात नवीन रुग्णालये आणि नवीन शाळा सुरू झाल्या. राज्यात एक्सप्रेस वे सुरू झाले. आता उत्तर प्रदेशमध्ये सर्वात मोठं विमानतळ तयार होत आहे”, अशा शब्दांत मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी योगी सरकारचे कौतुक केले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये १० फेब्रुवारीपासून निवडणूका होणार आहेत. एकूण ४०३ जागांसाठी या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशमध्ये ७ टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीचे निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या या निवडणुकांसाठी भाजप, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष रिंगणात उतरणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
५० ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देताय ‘हे’ पाच शेअर्स; एकाच आठवड्यात गुंतवणूकदार होतोय लखपती
बाप दारूवर पैसे उडवायचा, पोराने आईसोबत बांगड्या विकल्या; आज देशातील टॉपचा IAS आहे
दोन्ही हातानं गोलंदाजी करणाऱ्या १९ वर्षाच्या पोरानं क्रिकेटमधील दुजाभाव आणला समोर; पहा नक्की काय घडलं