Homeताज्या बातम्या५० ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देताय ‘हे’ पाच शेअर्स; एकाच आठवड्यात...

५० ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देताय ‘हे’ पाच शेअर्स; एकाच आठवड्यात गुंतवणूकदार होतोय लखपती

१० जानेवारीपासून सुरू झालेल्या शेअर बाजाराच्या या आठवड्याच्या अखेरीस, टॉप-५ शेअर्सपैकी एकाने ९० टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा दिला, तर उर्वरित शेअर्स ५० टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. शुक्रवारी शेअर बाजारात गेल्या आठवड्यात ५० टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या शेअर्सची संख्या ९ होती.

या बातमीत आम्ही तुम्हाला असे टॉप ५ शेअर्स सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या आठवड्यात सर्वाधिक परतावा दिला आणि गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. या शेअर्मध्ये आरटीसीएल लि., दौलत सिक्युरिटीज लि., साधना नायट्रो केम लि., चॉइस इंटरनॅशनल लि. आणि वासवानी इंडस्ट्रीज लि. यांचा समावेश होता.

आरटीसीएल लि. – ९१.४३ टक्के परतावा
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार करणाऱ्या ग्रुप एक्सच्या या शेअरने गेल्या आठवड्यात ९१.४३% परतावा दिला. परतावा देण्याच्या बाबतीत हा शेअर अव्वल ठरला. आरटीसीएल लिमिटेडचा स्टॉक गेल्या आठवड्यात ११.४४ रुपयांवर बंद झाला, तर यावेळी २१.९० रुपयांवर बंद झाला. जर कोणी गेल्या आठवड्यात या स्टॉकमध्ये १ लाख रुपये ठेवले असते तर आज शुक्रवारी त्याचे १ लाख ९१ हजार रुपये झाले असते.

दौलत सिक्युरिटीज लि. – ६७.२० टक्के परतावा
दौलत सिक्युरिटीज लिमिटेड या कंपनीने गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना ६७.२० टक्के परतावा दिला. गेल्या आठवड्यात हा स्टॉक २४.८५ रुपयांवर बंद झाला होता, तर १४ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात तोच स्टॉक ४१.५५ रुपयांवर बंद झाला. जर एखाद्याने १ आठवड्यापूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असते, तर तेच पैसे आज १ लाख ६७ हजार रुपये झाले आहे.

साधना नायट्रो केम लि. – ६५.२१ टक्के परतावा
साधना नायट्रोच्या शेअरने गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना ६५.२१ टक्के परतावा दिला आहे. गेल्या आठवड्यात हा शेअर ६७.४ रुपयांवर बंद झाला, तर या आठवड्याच्या अखेरीस त्याची किंमत १११.३५ रुपयांवर पोहोचली आहे. जर एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये १ लाख रुपये ठेवले असते तर एका आठवड्यात केवळ १ लाख ६५ हजार रुपये झाले असते.

चॉईस इंटरनॅशनल लि. – ५६.५१ टक्के परतावा
७ जानेवारी २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात, हा शेअर १५९.३५ रुपयांवर बंद केला होता. तर या आठवड्यात हाच शेअर २४९.४ रुपयांवर बंद झाला होता. चॉईस इंटरनॅशनल लिमिटेडने या १ आठवड्यात टक्के ५६.५१ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने १ आठवड्यापूर्वी या स्टॉकमध्ये १ लाखांची गुंतवणूक केली असेल, तर आतापर्यंत त्याची गुंतवणूक १ लाख ५६ हजार झाले असते.

वासवानी इंडस्ट्रीज लि. – ५६.१५ टक्के परतावा
वासवानी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्टॉकनेही या आठवड्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. बी ग्रुपचा हा शेअर गेल्या आठवड्यात बीएसईवर १८.७ वर बंद झाला होता, या आठवड्यात तो ६९.२ रुपयांवर बंद झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात कोणी १ लाखांची गुंतवणूक केली असती, तर ते आज १ लाख ५६ हजार रुपये झाले असते.

महत्वाच्या बातम्या-
पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर
दोन्ही हातानं गोलंदाजी करणाऱ्या १९ वर्षाच्या पोरानं क्रिकेटमधील दुजाभाव आणला समोर; पहा नक्की काय घडलं
अभिनेते किरण मानेंनी घेतली थेट शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ