Share

bjp : ‘आम्ही भाजपला फारसं महत्व देत नाही, ते दाखवण्यापुरते मित्र’; युतीसाठी उत्सूक भाजपला मनसेने जागा दाखवली

Devendra Fadanvis Raj Thackeray

bjp : आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजप – मनसेची युती होणार का? असा प्रश सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, अलीकडे भाजप नेते आणि मनसे नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्याच पाहायला मिळतं आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची देखील भेट झाली आहे.

मात्र अद्याप भाजप – मनसे युतीबद्दल ठोस निर्णय झालेला नाहीये. तर दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच कामाला लागले असल्याचं पाहायला मिळतं आहे. राज ठाकरे यांच्या तीन दिवसीय विदर्भ दौऱ्याला सुरूवात झाली आहे. राज ठाकरे सकाळी नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले आहे.

विशेष बाब म्हणजे, राज ठाकरे आज दिवसभर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातं आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत सांगतना, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी भाजप – मनसे युतीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

जाधव यांनी म्हंटलं आहे की, ‘आम्ही अजून कुठेही आमची युती होतेय, असं म्हटलेलं नाही. आम्ही सगळ्या जागांवर लढणार आहोत. आमचे सगळ्या पक्षात मित्र असल्याचं जाधव यांनी नमूद केलं आहे. तसेच भाजप दाखवण्यापुरते मित्र आहेत. आम्ही त्यांना फारसं महत्व देत नसल्याचं देखील जाधव यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक घोषणा केली. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मनसेने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. यामुळे आता भाजप – शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

देशपांडे यांनी सांगितलं की, आगामी सर्व पालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार आहे. मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मुंबईत सर्व जागांवर मनसेचे उमेदवार उभा करण्यात येणार आहेत. मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभा करणार आहे.’ मात्र युतीबद्दल अजून ठाम निर्णय झाला नसल्याच दिसतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के..! माजी आमदारासह तब्बल ५० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
Bachchu Kadu : बच्चू कडूंना राडा भोवला; कोर्टाने केली थेट कोठडीत रवाणगी, आता खावी लागेल जेलची हवा
Jayant Patil : महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?
स्कुल बसचालकाचा चिमुकलीवर बलात्कार, २४ तासांत आरोपीच्या राहत्या घरावर बुलडोझर!

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now