Share

खुशखबर! गाड्यांचे रजिस्ट्रेशन आता कुठूनही करता येणार; अर्थसंकल्पात ऑटो सेक्टरला मोठा दिलासा

nirmala sitaraman

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. तब्बल दीड तास निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून ऑटो सेक्टरला मोठा दिलासा दिला आहे. तर जाणून घेऊ का नेमकी कोणती घोषणा सीतारामन यांनी केली आहे.

आता गाड्या रजिस्टर करण्यासाठी एक पोर्टल लाँच केले जाणार आहे. याचा फायदा वाहन कंपन्या आणि वाहन मालकांना होणार आहे. याचे कारण असे की, सर्वच कंपन्यांचे शोरुम प्रत्येक जिल्ह्यात, आरटीओ क्षेत्रात नसतात. यामुळे एका जिल्हयात गाडी खरेदी करून ती वाहन मालकाच्या दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन रजिस्टर करावी लागते.

यामुळे वाहन मालकांना नाहक त्रास होतो. मात्र आता मुंबई, पुण्यात राहणारा व्यक्ती त्याच्याकडील कागदपत्रांवर गावचा पत्ता असेल तरी देखील या शहरांतून गाडी रजिस्टर करू शकणार आहे. त्यासाठी त्याला शहरातून टेम्पररी पासिंगवर गाडी गावच्या आरटीओकडे घेऊन जाण्याची गरज राहणार नाही.

दरम्यान, याबाबत बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, ‘शहरातील ईव्ही प्लॅनिंगसाठी सेंटर फॉर एक्सलंस तयार केले जातील. 7 मोबिलिटी झोन बनविले जातील. 9 फॉसील फ्युअल असेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये ईव्हीला प्रोत्साहन दिले जाईल. चार्जिंग स्टेशन वाढविले जातील.’

तसेच निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करताना शेतकरी, तरुण, उद्योग, व्यावसायिकांसह, महिलांसाठी नव्या योजनांची घोषणा केली आहे. महिला सबलीकरणासाठी अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या मिशन शक्ती, मिशन वात्सल्य आणि सक्षम आंगणवाडी आणि पोषण 2.0 सारख्या योजनांना व्यापक रुप देणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, सीतारमण यांनी देशातील कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरलं जाणार असल्याची घोषणा केली. किसान ड्रोन्सचा वापर आता शेतीमध्ये केला जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. हे कृषी ड्रोन्स पिकांची पहाणी करणे, जमीनीच्या नोंदी ठेवणे तसेच किटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरले जाणारे आहेत. कृषी आणि पिक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार आहे, असं त्या म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या
जागो ग्राहक जागो! ऑफरच्या नावाखाली ग्राहकांची होतेय फसवणूक, खाली होतोय खिसा
‘काही लग्नांच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात’, जोडप्याच्या वादावर हायकोर्टाची संतप्त प्रतिक्रिया
“हिंदुस्तानी भाऊला सोशल मीडियावर प्रस्थापित करून त्याला फेमस करणारी कंपनी भाजप”
मोठी बातमी! चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला ठोकल्या बेड्या

आर्थिक इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now