Share

Pune : एका रिक्षामागे ६०० रूपये हप्ता देतो मग पोलिसांना कशाला घाबरू? भर पब्लिकमध्ये पोलिसांची वसूली झाली उघड

auto

auto driver revelead shocking information  | रिक्षामध्ये फक्त ३ प्रवाशांना घेऊन जाण्याची परवानगी आहे. असे असले तरीही रिक्षावाले जास्त लोकांना घेऊन जाताना दिसतात. पण असे करणे धोकादायक ठरु शकते. असे असनाही ते ६ प्रवाशांना घेऊन जाताना दिसतात. अशात काही रिक्षावाल्यांनी परवानगी नसताना जास्त लोकांना घेऊन जाण्याबाबत हैराण करणारी वक्तव्ये केली आहे.

एका गाडीमागे २५० ते ३०० रुपये देतो, मग घाबरु कशाला असे रिक्षावाल्याने म्हटले आहे. तो त्याच्या रिक्षामध्ये ६ प्रवाशांना घेऊन जात होता. आरटीओने ३ प्रवाशांनाच रिक्षात बसवण्याची परवानगी दिली आहे. असे असतानाही ६ प्रवाशांना नेले जाते. त्यामुळे या सर्व प्रकरणांवर आरटीओ कारवाई का करत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा शेअरमध्ये चालते. त्यानुसार आरटीओने काही नियम सुद्धा ठरवून दिले आहे. वाहतूक ही आरटीओने ठरवून दिलेल्या मार्गानेच करण्यात यावी, असा नियम आहे. तसेच रिक्षात तीन प्रवासी, अंगावर ड्रेस, वाहतूक परवाना, असे नियम सुद्धा आहे. पण हे नियम काही रिक्षावाले सऱ्हासपणे मोडताना दिसून येतात.

निगडीच्या एका रिक्षावाल्याने असे म्हटले आहे की, आमच्या रिक्षा स्टँडवर तीस रिक्षा आहे. प्रत्येक रिक्षामागे आम्हाला ३०० रुपये द्यावे लागतात. प्रत्येक महिन्याच्या एक ते सात तारखेपर्यंत आम्ही पैसे जमा करतो. ते आम्ही संबंधित एजंटकडे देतो. त्यांच्याकडे आमच्या सर्वांच्या रिक्षा नंबरची यादी असते.

तर दुसरा एक रिक्षाचालक म्हणाला की, मी भोसरी ते पिंपरी आणि पिंपरी ते भोसरी अशी शेअर रिक्षा करतो. माझ्याकडे परवाना नाहीये. त्यामुळे मला भोसरीतील एजंटला आणि पिंपरीतील एजंटला ३००-३०० रुपये द्यावे लागतात. ज्यांच्याकडे परवाना नाही त्यांना कारवाई होण्यापासून वाचण्यासाठी असेच काही करावे लागते.

तर यावर पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, नियमभंग कऱणाऱ्या रिक्षा चालकांवर नियमितपणे कारवाई केली जाते. जे एजंट रिक्षाचालकांकडे पैशाची मागणी करतात, त्यांची तक्रार रिक्षाचालकांनी थेट आरटीओ कार्यालयात करावी.

महत्वाच्या बातम्या-
uddhav thackeray : ठाकरेंनी केला मोठा गेम, फिल्डिंग लावली अन् राष्ट्रवादीलाच दिला धक्का, ‘या’ बड्या नेत्याने हातात घेतला भगवा
सिराज – कुलदीपने मोडले बांगलादेशचे कंबरडे; बांगला फलंदाजांना अक्षरश नाचवले
शाहरुखच्या सिनेमात भगव्याचा अपमान झाल्याचा आरोप; दीपिकाच्या बोल्ड ड्रेसमुळे हिंदू संघटना खवळल्या

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now