bhausaheb chikatgaokar in uddhav thackeray group | गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात मोठा बदल होत आहे. शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर काही नेते शिंदे गटात प्रवेश करत आहे, तर काही नेते ठाकरे गटात प्रवेश करत आहे. असे असाताना राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. चिकटगांवकर यांच्याविरोधात जाऊन जयंत पाटील यांनी भाऊसाहेब ठोंबरे आणि पंकज ठोंबरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला होता.
जयंत पाटलांची ही भूमिका चिकटगांवकर यांना खटकली होती. तसेच सतीश चव्हान यांच्यासोबतही त्यांचे खटके उडत होते. त्यामुळे अखेर चिकटगांवकर यांनी राष्ट्रवादीला काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. चिकटगांवकर यांचा शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादीला वैजापूरमध्ये मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
ठोंबरे काका पुतण्या यांना जयंत पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिला होता. त्यामुळे चिकटगांवकर हे खुप नाराज झालेले होते. ठोंबरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर चिकटगांवकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आपल्यासाठी सर्वपर्याय खुले असल्याचे म्हटले होते.
चिकटगांवकर हे नाराज होते तरी पक्षातील नेत्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अशात त्यांनी वैजापूरचा दौरा केला. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच कुठल्या पक्षात जाता येईल अशी विचारणा केली. त्यानंतर चिकटगांवकर यांनी शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
चिकटगांवकर यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांचे बारीक लक्ष होते. त्यांनी याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सांगितले. त्यानंतर दानवेंनी राजकीय समीकरणे जुळवत चिकटगांवकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर चिकटगांवकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. पण आता त्यांची जागा भरुन काढण्यासाठी चिकटगांवकर हे ठाकरे गटात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
सिराज – कुलदीपने मोडले बांगलादेशचे कंबरडे; बांगला फलंदाजांना अक्षरश नाचवले
धक्कादायक! आवडीनं खाता रस्त्यावरील चटकदार पदार्थ? मग हा व्हिडिओ बघाच
‘आम्ही बाबर आझमपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करतो’; पाकिस्तानी चाहते विराटसाठी वेडे, लिहिला खास संदेश