एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकारला धोका निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात ४० पेक्षा जास्त आमदार असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता वाढली आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. (aurangabad rename sambhajinagar thackeray government decision)
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन महत्वाचे निर्णय घेतले आहे. गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यात यावे अशी मागणी केली जात होती. आता याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे करण्यात आले आहे. तसेच नवी मुंबईच्या विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. आधी नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार होते. पण आता त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मांडण्यात येईल, अशी माहिती मंगळवारीच परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. त्यानंतर अखेर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेकडून औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याची मागणी केली जात होती. अखेर दोन्ही निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आले आहे. या निर्णयाला काँग्रेसचा विरोध होता. असे असतानाही हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहे. तुम्ही मला साथ दिली त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार. माझ्याच पक्षातील लोकांनी मला दगा दिला, पण तुम्ही मात्र आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे आभार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच पुढील निर्णय पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊ, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता अनेकांसाठी आहे देवता, गरीबीतून उभं केलंय करोडोंचं विश्व
नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेंस-शिवसेनेत वाद, पुण्याचं नाव जिजाऊनगर करण्याची मागणी
‘फूल और कांटे’मधून हिट झालेला अजय देवगण आहे ‘एवढ्या’ कोटींचा मालक, प्रायवेट जेटमधून करतो प्रवास