Share

भयानक! कॉलेजमधून २०० फुटांवर ओढत नेले, नंतर चाकु भोकसून केला खुन; हत्येच्या कारणाने पोलिस हादरले

आंधळ्या प्रेमातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता अशीच एक घटना औरंगाबादमधून समोर आली. औरंगाबादमध्ये भरदिवसा एका विद्यार्थीनीचा खुन करण्यात आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (aurangabad 19 year old student murder)

औरंगाबाद शहरातील देवगिरी कॉलेज परीसरात ही घटना घडली आहे. तरुणाने विद्यार्थीनीला कॉलेजमधून २०० फूट ओढत नेले. त्यानंतर तिची सुऱ्याने भोकसून हत्या केली आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भरदिवसा अशी घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकतर्फी प्रेमातून कॉलेजच्या विद्यार्थ्याने ही हत्या केल्याचे म्हटले जात आहे. तसेच पोलिस या आरोपीचा शोध घेत होते. त्यानंतर त्याला आता अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर आजूबाजूचे सीसीटीव्ह फुटेज तपासण्यात आले होते. यात एक मुलगा एका विद्यार्थीनीला बळजबरीने ओढत घेऊन जाताना दिसत होता. त्यानंतर तो तिला कॉलेजपासून जवळजवळ २०० फुट लांबपर्यंत घेऊन गेला आणि एका ठिकाणी नेऊन तिच्या हत्या केली.

१९ वर्षीय मृत विद्यार्थीनी आणि तिचा मारेकरी एकाच वर्गात शिकत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विद्यार्थीनी बीबीएच्या वर्गात शिकत होती, अशी माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणी औरंगाबादचे पोलिस आणखी तपास करत आहे.

दरम्यान, विद्यार्थीनीची भरदिवसा हत्या झाल्यामुळे संपुर्ण शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच तिथल्या कॉलेजच्या विद्यार्थीनींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
शॉर्ट्स घालते म्हणून सुनवायचे लोकं, तीच बनली वर्ल्ड चॅम्पियन, वडिलांनी सांगितली संघर्षाची कहाणी
गावस्करने हेटमायरच्या पत्नीवर केली ‘ही’ अश्लील कमेंट, संतापलेले चाहते म्हणाले, इतरांच्या बायकोवर..
बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना रेल्वेच्या ७२ हजार नोकऱ्या रद्द, कारण वाचून चक्रावून जाल

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now