Share

‘’भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला…’’

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) सक्तवसुली संचलनालयाने ताब्यात घेतले आहे. मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईने महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. तसेच आता मलिक यांच्या अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. त्यानुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (daud ibrahim) याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून ही कारवाई सुरू आहे.

त्यावरून आता अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनी महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. मलिकांवर कारवाई झाल्यानंतर भाजपनेही त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनीही एक ट्विट केले आहे जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नवाब मलिकांवर कारवाई झाल्यानंतर त्यांनी ट्विट केले की, भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला. तसेच त्यांच्या या ट्विटला भाजप नेते मोहित कंबोज यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ‘हर हर महादेव’ असे ट्विट केले आहे. दरम्यान, आज सकाळी पाच वाजताच ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक नवाब मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

त्यानंतर जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचे सांगितल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतल्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली.

तसेच याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सध्या मिळाली आहे. या प्रकरणामुळे सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मलिक यांनी यावरून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. याबाबत बोलताना ते म्हणाले होते की, ‘देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू.’

महत्वाच्या बातम्या
श्रीमंतांच्या या टीप्स वापरल्या तर तुम्हीही व्हाल मालामाल, आजपासूनच अंमलात आणा
स्वतःच्या घरावर भाजपचा झेंडा बघून सपा उमेदवाराला बसला धक्का; रडत-रडत पडला बेशुद्ध, पहा व्हिडिओ
पहा अंबानींच्या सुनेचा विवाहातील ‘रॉयल लूक’, लेहंगा आणि ज्वेलरीची किंमत ऐकून तुमचे डोळे फिरतील
विचित्र व्यायाम! 12व्या मजल्याच्या बाल्कनीत रेलिंगला लटकून करत होता व्यायाम, व्हिडीओने उडाली खळबळ

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now