Share

निवडणुकीतील पराभवाने निराश झालेल्या सपा नेत्याने विधानभवनासमोर स्वत:ला पेटवले

sp leader

आज पाच राज्याच्या निवडणुकांच्या निकाल हाती आले आहेत. संपूर्ण देशाच लक्ष या निकालाकडे लागले होते. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्तेची सेमिफायनल भाजपनं जिंकली आहे. पाच पैकी चार राज्यात भाजपनं आपला करिष्मा कायम ठेवला आहे.

तर तिकडे पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं इतर पक्षांचा सुपडासाफ केला आहे. मात्र या निवडणुकीत समाजवादी पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे सध्या पक्षात चिंतेचे वातावरण वातावरण पसरले आहे. अशातच पराभव जिव्हारी लागल्याने सपा नेत्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

या निवडणुकीत कानपूरमधून समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह ऊर्फ ​​पिंटू यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्याने दु:खी आणि हताश होऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्र सिंह ऊर्फ ​​पिंटू यांनी आत्मदहनासाठी स्वतःला आग लावली. यावेळी त्यांच्यावर पोलिसांची नजर गेली. पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ते ४० टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटणेबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, नरेंद्र कानपूरमध्ये सपाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. रूग्णालयात जाताना ओरडत होते की भाजपने पुन्हा सरकार स्थापन केल्याने मला दु:ख झाले आहे. ही घटना चार वाजताच्या सुमारास विधान भवनासमोर घडली.

अचानक नरेंद्र सिंह ऊर्फ ​​पिंटू यांनी स्वतःवर तेल ओतले. त्यानंतर आग लावली. पोलिसांनी त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. आता तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. याचबरोबर ते 40 टक्के भाजल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘हे मर्दांचं राज्य आहे त्यामुळे बलात्कारांमध्ये नंबर वन आहोत’; काॅंग्रेस मंत्र्याची जीभ घसरली
पत्नीला वाचवण्यासाठी डाॅक्टरची तडफड; गहाण ठेवली MBBS ची डिग्री गहाण; कहाणी वाचून येईल डोळ्यात पाणी
भाजपच्या ‘या’ रणनितींमुळे योगींना पुन्हा रचता आला इतिहास, जाणून घ्या कसे मिळाले भाजपला बहूमत
दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनून इतिहास रचणाऱ्या योगींचे ‘बुलडोझर बाबा’ म्हणून लागले पोस्टर; जाणून घ्या कसं पडलं हे नाव

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now