जेपी नड्डा(J.P. Nadda)भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कोझिकोड मध्ये आयोजित केलेल्या ‘मोदी ऍट 20’ या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जोरदार कौतुक केले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना प्रत्येकवेळी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात. पाकिस्तानला प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मिळावी यावर भर देण्यात येतो.
पंतप्रधान मोदी अनेक दशकांपासून राजकारणात आहेत, परंतु भ्रष्टाचाराने त्यांना कधीही स्पर्श केला नाही. असेही जेपी नड्डा म्हणाले. पुढे ते म्हणाले की, अनेक वर्षे केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी पाकिस्तानातून आपल्या मनाप्रमाणे दहशतवादी हल्ले केले जात होते. पण त्यानंतर पंतप्रधान मोदींनी एका प्रचारसभेत सांगितले की, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
त्या इशाऱ्यानंतरच पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. पण त्यानंतरही पाकिस्तान सुधारला नाही, त्याने आणखी एक दहशतवादी हल्ला केला. तेव्हा पीएम मोदी म्हणाले होते की, पाकिस्तानने मोठी चूक केली आहे आणि त्याची मोठी किंमत त्याला चुकवावी लागेल. त्यानंतर पुन्हा पाकिस्तानवर हवाई हल्ला करण्यात आला.
पीएम मोदींची लोकप्रियता काळाबरोबर वाढत आहे, यावरही भाजप अध्यक्षांनी भर दिला. नड्डा यांच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदी एक जीवन एक ध्येय हे त्यांच्या जीवनाचे तत्त्व मानतात आणि त्यासोबत जगतात. आपल्या भाषणात भाजप अध्यक्षांनी असा दावाही केला की, पंतप्रधान मोदींनी भारताचा सांस्कृतिक वारसा संपूर्ण जगासमोर सुंदरपणे मांडला आहे.
पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावर आतापर्यंत अनेक पुस्तकं आणि एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता त्यामध्ये आणखी एका पुस्तकाची एप्रिल महिन्यात भर पडली. ते पुस्त्तक म्हणजे ‘modi @ 20’. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मुख्यमंत्रीपदाच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे ‘modi @ 20: dreams meet delivery’ हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर अनेक दिग्गजांनी भाष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
Corona-HIV-Monkeypox : ‘या’ ठिकाणी आढळला एकाचवेळी कोरोना, एचआयव्ही आणि मंकीपॉक्स झालेला पहिला रुग्ण, उडाली खळबळ
call girl : अजब! पर्यटकाला मौजमजा करणे पडले महागात, कॉल गर्लने दारूच्या नशेत खाल्ला कान अन्…
नदी आटल्यानंतर सुकलेल्या पात्रात दिसलं ‘हे’ भयानक दृश्य; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
लेकीने आईची हाक ऐकली; मृत्यूच्या 12 तासांनंतर अचानक जिवंत झाली अन्…, वाचून बसेल धक्का