Share

shivsena : भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न; राजकीय लढाई घरापर्यंत पोहोचली, वाचा नेमकं काय घडलं?

Bhaskar Jadhav

shivsena : राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर येतं आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून याच प्रकरणावर आता अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव हे सातत्याने शिंदे गटाला टार्गेट करताना पाहायला मिळत आहे. या राजकीय लढाईचे पडसाद आता घरापर्यंत गेले असल्याच यातून स्पष्ट होतं असल्याचं बोललं जातं आहे. नुकतीच जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे.

बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जाधव यांच्या चिपळूणमधील घरासमोर जगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या सापडल्यामुळे स्थानिक परिसरात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मिळालेल्या महितीनुसार, जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली आहे. अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री भास्कर जाधव यांच्या घरावर दगड फेकले.तर दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेतली आहे.

या प्रकरणावर अद्याप जाधव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र असं असलं तरी देखील, भाजप नेते नितेश राणे यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे.  ‘भास्कर तोंड फुटल्यासारखं बोलत आहेत. टीका करायची असेल तर ती फक्त राजकारणापूर्तीच करा पण खालच्या पातळीवर जाऊन बोलाल तर कार्यकर्ते रिअॅक्शन देणार. जाधव यांना बोलण्याची सवय आहे तर त्यांनी ह्या देखील गोष्टी सहन करण्याची सवय ठेवली पाहिजे.’

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now