Share

Andheri By-Election : भाजपचा नववी पास उमेदवार निघाला ‘एवढ्या’ कोटींचा मालक, लटकेंकडे किती संपत्ती?

rutuja latake and patel

Andheri By-Election : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली अंधेरी पूर्व पोटनिवडणूक येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. याठिकाणी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे गटाने आपल्या बाजूने उमेदवार उभा करत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटा विरोधात भाजपने आपला उमेदवार उभा केलाय. त्यामुळे अटीतटीची लढाई होणार असल्याचे यावरून स्पष्ट होते. या उमेदवारांनी १४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी देऊ केली. १४ तारखेला उमेदवारी अर्जामध्ये दोन्ही उमेदवारांची संपत्ती आयोगासमोर स्पष्ट झाली. त्यामध्ये दोन्ही उमेदवारांच्या संपत्तीत मोठा फरक आढळून आल्याचे दिसते.

ऋतुजा लटके यांच्याकडे ४३ लाख ८९ हजार, ५०४ रुपये एवढी संपत्ती आहे. तसेच लटके यांच्या मुलाच्या नावावर १२.३५ एकर जमीन आहे. लटके यांच्या नावावर १५ लाख २९ हजार रुपयांचे गृह कर्ज आहे. तसेच दिवंगत रमेश लटके यांच्या नावावर ५१ लाखाची स्थावर मालमत्ता आहे. ज्या संपत्तीची अजूनही ऋतुजा लटके यांचा नावावर नोंद झालेली नाही. प्रतिज्ञापत्रामध्ये ऋतुजा लटके पदवीधर असल्याचे सांगितले आहे.

दुसरीकडे भाजप मुरजी पटेल हे उमेदवार मोठ्या संपत्तीचे मालक असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे तब्बल १० कोटी ४१ लाख एवढी संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रकात सांगण्यात आले. त्यामध्ये मुरजी पटेल यांच्या नावावर ५ कोटी, ४१ लाख तर त्यांच्या मुलाच्या नावे इतर ५ कोटी आहेत. तसेच गुजरातमधील कच्छ येथे ३० एकर जमीन मुरजी पटेल यांच्या मालकीची आहे. पटेल यांचे शिक्षण नववीपर्यंत झाल्याचे प्रतिज्ञापत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिज्ञापत्रकात दोन उमेदवारांच्या संपत्तीत मोठा फरक आढळतो. तरी निवडणुकीनंतर कशा प्रकारचा फरक यांच्या मतांमध्ये असेल? याचे उत्तर निवडणुकीनंतर मिळेल. मात्र सध्या तरी १४ तारखेला निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी मतदासंघात प्रचाराचा नारळ फोडला आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून दारोदारी मतदारांच्या भेटी घेण्याकडे ऋतुजा लटकेंचा भर दिसत आहे. तर दुसरीकडे अशाच प्रकारे मतदारसंघात फिरून लोकांच्या भेटी घेण्यावर भाजपही भर देताना दिसते आहे. याठिकाणी ऋतुजा लटके यांना काँग्रेसचा आधीच पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र भाजप आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कोणत्या बड्या नेत्याला मतदारसंघात उतरवणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-
politics : बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा रुपाली पाटलांनी घेतला समाचार, म्हणाल्या, पुढच्या सात जन्मातही…
Raj Thackeray : राज ठाकरेंनी निवडणूक न लढवताच जिंकली मने; सेनेला पाठिंबा देत फडणवीसांनाही केली ‘ही’ विनंती
Baba Ramdev : बाबा रामदेव यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, सलमान ड्रग्स घेतो अन् आमिर खानचं…

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now