Share

पतीने सामना जिंकवताच मुलीला कडेवर घेऊन नाचू लागली अश्विनची पत्नी, सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) मध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (rajasthan royals vs chennai super kings) यांच्यात एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला. राजस्थान (RR) ने हा सामना जिंकला.

या विजयासह राजस्थाननेही दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित ठेवून प्लेऑफमध्ये उडी घेतली आहे.या सामन्यात राजस्थानचा (RR) खेळाडू रविचंद्रन अश्विनने शानदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पहिल्यांदा गोलंदाजीत त्याने अप्रतिम खेळ दाखवला.

त्यानंतर त्याने फलंदाजीतही जबरदस्त खेळी केली. यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचवेळी सामना जिंकल्यानंतर स्टँडवर बसलेल्या अश्विनची पत्नी प्रीती आणि मुलींनीही आनंद व्यक्त केला.प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने (CSK) राजस्थानला 151 धावांचे लक्ष्य दिले.

या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती. त्यानंतर अश्विनने शानदार चौकार मारला. त्याचवेळी रियान परागने एक धाव घेतली. शेवटी गोलंदाज मथिशा पाथिरानाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्यानंतर अश्विनने जबरदस्त सेलिब्रेशन केले.

सामना जिंकल्यानंतर स्टँडवर बसलेल्या अश्विनची पत्नी प्रीती नारायणनेही आपल्या दोन मुलींसोबत आनंद साजरा केला. तिने आपल्या धाकट्या मुलीला कडेवर उचलले आणि आनंद व्यक्त केला. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्याचवेळी अश्विननेही सामना जिंकल्यानंतर मैदानावर जल्लोष साजरा केला.

अश्विन आणि त्याच्या कुटुंबाचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अश्विनने चेन्नईविरुद्ध गोलंदाजी करताना 28 धावांत एक विकेट घेतली. फलंदाजी करताना 23 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी खेळली. त्याची ही खेळी राजस्थानसाठी निर्णायक ठरली.

महत्वाच्या बातम्या
बाॅलीवूडला मागे टाकत ‘धर्मवीर’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; कमाई ऐकून डोळे पांढरे होतील
लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेल्या टेडी बेअरचा स्फोट, नवरदेवाने गमावले दोन्ही डोळे, वाचून हादराल
‘ब्राह्मणांना आरक्षण देता येणार नाही, त्यांनी आरक्षणाला विरोध करू नये’; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले
लग्नपत्रिकेत तब्बल ३५० पेक्षा जास्त लोकांची नावं; इस्लामपूरच्या लग्नपत्रिकेची राज्यभरात चर्चा

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now