चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांना विजयी आघाडी; नाना काटेंच्या वाटेत कलाटेंचे काटे, वाचा नेमकं काय घडलं

गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज( २ मार्च) जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजता मोजणी सुरू झाली असून कसब्याचा निकाल जाहीर झाला आहे.

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांनी दुसऱ्या फेरीत ४७० मतांची आघाडी मिळवली आहे. तर चिंचवड मध्ये पाचव्या फेरीत अश्विनी जगताप १,५४७ मतांनी आघाडीवर आहेत. नाना काटे हे १५०० मतांनी मागे आहेत. तर राहुल कलाटे तिसऱ्या स्थानी आहेत.

१२व्या फेरीत अश्विनी जगताप यांना चिंचवडमध्ये ४२६७१ मत मिळाली आहेत. तर नाना काटेंशा ३४३३८ मत मिळाली आहे. राहूल कलाटे यांना १४१७१ मते मिळाली असून विसाव्या फेरीअखेरीस चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप १० हजार ९२ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे अश्विनी जगताप विजयाच्या जवळ आहे.

यादरम्यान, संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आणि तब्बल २८ वर्ष भाजपच्या गड असलेल्या कसबा मतदार संघात काँग्रेसच्या रवींद्र गंगेकर यांनी विजय मिळवला आहे. भाजपच्या हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव करत महावीस विकास आघाडीने विजय मिळवला आहे.

पहिल्या दिवसापासून वादात राहिलेल्या पोटनिवडणुकीत मतदार राजानं कसबा मतदार संघात महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी कौल दिला आहे. पिंपरी चिंचवड मध्ये अश्विनी जगताप विजय होतील शक्यता वर्तवली जात आहे.

यादरम्यान, मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या पार पडणार आहेत. यासाठी प्रत्येक १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. मतमोजणी कामकाजासाठी १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
श्वास रोखून धरणारा सामना! विजयासाठी हव्या होत्या फक्त 4 धावा, पण 5 चेंडूत पडल्या 5 विकेट
कोण आहे ‘ती’ व्यक्ती ज्यांच्यामुळे सीबीआयने मनीश सिसोदियांना केले गजाआड? जाणून घ्या…
अभिनेत्यांनी बोलावल्यावर मी त्यांच्या खोलीत जात नाही; चित्रपट माफियांवर भडकली कंगना