Share

अभिनय नाही तर ‘ह्या’ क्षेत्रात मास्टर आहे अशोक सराफ यांचा एकूलता एक मुलगा; वाचा त्याच्याबद्दल

अशोक सराफ यांची मराठी सिनेमासृष्टीत मामा अशी ओळख आहे. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने अनेक मराठी चित्रपट सुपरहिट केले आहे. सिनेमात अनेकदा असे हो राहते की बाप अभिनय क्षेत्रात असेल तर मुलगाही अभिनय क्षेत्रात असतो, पण अशोक सराफ आणि त्यांच्या मुलाच्या बाबतीत जरा वेगळंच आहे.

भारतातील कित्येक घरात बाप तसा बेटा, असे आपल्याला पाहायला मिळते. पण अशोक सराफ जरी चित्रपट सृष्टीत असले, तरी त्यांचा मुलगा यापेक्षा पुर्णपणे विरुद्ध क्षेत्रात काम करतो. चला तर मग जाणून घेऊया अशोक सराफ यांच्या मुलाबद्दल. तो नक्की काय करतो आणि तो कोणत्या क्षेत्रात सध्या कार्यरत आहे.

अशोक सराफ यांच्या पत्नीचे नाव निवेदिता जोशी सराफ आहे. त्यांनी देखील अभिनय क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. सध्या त्या झी मराठीवरील मालिका अग्ग बाई सुनबाईमध्ये काम आसावरीची भुमिका पार पाडत आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे दोघेही अभिनयात काम करत आहे, मात्र दाम्पत्याचा मुलगा यांच्यापेक्षा अपवाद आहे.

या दाम्पत्याच्या मुलाचे नाव आहे अनिकेत सराफ. अनिकेत हा लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रापासून लांब राहीला आहे. त्याने त्याचे आवडीचे करियर निवडले आहे. अनिकेत हा एक शेफ आहे.

अनिकेत लहानपणापासूनच आपली आई म्हणजेच निवेदिता यांना जेवण बनवताना पाहायचा. म्हणून त्याला जेवणाविषयी आवड निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने आपल्या आईवडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न जाता शेफ बनण्याचा निर्णय घेतला.

अनिकेतचे सर्व शिक्षण भारतात झालेले नाही, तर त्याने आपले शिक्षण फ्रान्समध्ये घेतले आहे. तो एक अप्रतिम शेफ आहे. त्याला पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खुप छान बनवता येते. त्याचे युट्युबवर निक सराफ नावाचे चॅनेल आहे. त्यावर तो वेगवेगळ्या रेसिपींचे व्हिडिओ अपलोड करत असतो. निवेदिता सराफ यांचीही हिच इच्छा होती की अनिकेतने अभिनयाऐवजी शेफ बवाने. त्याने आपल्या आईचे स्वप्न पुर्ण केले आहे.

महत्वाच्या बातम्या
एकता कपूरच्या यशामागे आहे अशोक सराफ यांचा हात, एकताने सांगितले खरे कारण…
सेक्स दरम्यान प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत घडला भयानक प्रकार, व्हावे लागले रुग्णालयात दाखल
सौरव गांगुलीने राजीनाम्याचा प्रँक केल्यानंतर चाहत्यांनी केले ट्रोल, भन्नाट मीम्सचा पडला पाऊस
UPSC पास झाला! सर्वत्र आनंदोत्सव, मिठाई वाटली, चॅनेल्सला मुलाखती दिल्या; नंतर भयंकर सत्य आले समोर

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now