नुकताच अशोक सराफ यांचा वाढदिवस पार पडला. या वाढदिवसाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्याच्याआधी त्यांनी एक मुलाखत दिली होती जी सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये अशोक सराफ यांनी बॉलिवूडवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, प्रेक्षकांना चेहऱ्यापेक्षा त्यांचं काम महत्वाचं वाटतं. बॉलिवूडच्या दृष्टीनं मराठी माणूस हा नायकाच्या संकल्पनेत बसतच नाही.
मराठी कलाकार हिंदी चांगलं बोलू शकत नाही, असाही हिंदी चित्रपटसृष्टीत गैरसमज आहे. मला बॉलिवूडमध्ये काही चांगल्या भूमिका मिळाल्या पण काही फालतू भूमिकाही मिळाल्या. त्या मी वेळ असल्यानं केल्या. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना म्हणावी तशी किंमत नाही.
पुढे ते म्हणाले की, रंगभूमीवरचे कलाकार असल्याची जाणीव ठेवून मात्र मराठी कलाकारांना बॉलिवूडकर टरकून असतात. पुढे ते म्हणाले की, १९७५ सालची गोष्ट आहे. डार्लिंग डार्लिंग या नाटकाचे प्रयोग करत होतो. नाटक करत असताना मी एका चित्रपटाचे चित्रीकरणही करत होतो.
दहा दिवसात फक्त तीन तासांची झोप घेतली. रोज काम केलं पण अकराव्या दिवशी तापाने फणफणलो होतो. मला तब्बल १०२ ताप होता. अंगाला स्पर्श केल्यावर चटका बसतोय असं राजा गोसावी म्हणाले. एवढं सगळं असतानाही मी ८ प्रयोग केले. काम करताना ताप जायचा आणि काम संपल्यावर ताप यायचा.
एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राज्याबाहेर गेलो असताना माझ्या वडिलांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याचं धाकड्या भावानं सांगितलं. चित्रीकरण झालं नाही, तर निर्मात्यांचं खुप मोठं नुकसान झालं असतं त्यामुळं मला चित्रीकरण करावं लागलं.
एक क्षण असाही आला की वडील गेल्याची बातमी मला मिळाली, असे अनेक प्रसंग झेलावे लागले. मामा म्हणतात की, मला आयुष्यात कधीही संघर्ष करावा लागला नाही. मी रंगभूमीवर काम करत होतो तेव्हा १९६७ मध्ये अचानक मला स्टेट बॅंकेकडून बोलावणं आलं. आर्टिस्ट कोट्यातून मला नोकरी मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या
अरब देशातील कचराकुंडीवर मोदींचा फोटो; कॉंग्रेसने मोदींची बाजू घेत तीव्र शब्दात केली नाराजी व्यक्त
नवा झुनझुनवाला झाला तयार! २३ व्या वर्षी शेअर मार्केटमधून कमावले १०० कोटी; १७ वर्षांचा असल्यापासून करतोय ट्रेडींग
पाहताच क्षणी गडकरींनी ‘या’ इलेक्ट्रिक बाईकची घेतली टेस्ट ड्राइव्ह, भन्नाट फिचर्स अन् किंमतही कमी
अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो; राजकारण तापलं