अशोक सराफ यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्यासोबत घडलेले अनेक प्रसंग सांगितले. शारिरीक तंदरूस्तीबाबतही त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. यावर बोलताना ते म्हणाले की, आवड आणि ध्यास. ते असेल आणि मला हे करायचंच आहे अशी जर मानसिकता असेल तर शारिरीक क्षमता नसतानाही काम निभावून नेणे शक्य होतं.
पुढे अशोकमामा म्हणाले की, कौतुक होणं आणि चित्रपट हिट होणं यात खुप फरक आहे. ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना निखळ मनोरंजन हवं असतं. शहरातला प्रेक्षकही आज मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटात विभागला आहे. सैराट चित्रपटाच्या विषयात तसं काही नावीन्य नव्हतं पण त्याची ग्रामीण पार्श्वफूमी, मांडणी आणि धक्का देणारा शेवट तोही ग्रामीण भागातला, हे महत्वाचे गुण होते, असं सैराटबद्दल अशोक सराफ म्हणाले.
दरम्यान, रंजना देशमुख आणि अशोक सराफ यांची जोडी एकेकाळी मराठी पडद्यावर प्रचंड गाजली. त्यांनी मिळून अनेक चित्रपट केले. त्यातल्या त्यात ‘बिनकामाचा नवरा’ हा त्यांचा सिनेमा आजच्या पिढीलाही पुरतं वेडं करतो. दोघांनी मिळून आपल्या अचूक विनोदी टायमिंगनं तेव्हा चाहत्यांना वेड लावलेच होते, पण आता देखील तरुण तरुणींना हा सिनेमा पाहावास वाटतो.
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. म्हणाले, रंजना जेव्हा सिने-इंडस्ट्रीत आली तेव्हा तिनं सुरुवातीला विनोदी सिनेमे किंवा विनोदी भूमिका केल्या नाहीत. तिनं विनोदी भूमिकांना सुरुवात केली ती माझ्यासोबत केली.
तेव्हा तिने निभावलेल्या भूमिकेबद्दल तिची खूप स्तुती झाली. अनेकांनी म्हटलं देखील विनोदात रंजना मला भारीच पडतेय. पण मी देखील हे मान्य करायचो, कारण ती नटी म्हणून ग्रेट आहे यावर तोपर्यंत मी शिक्कामोर्तब केलं होतं. अशी कोणतीच भूमिका नाही जे रंजनाला जमणार नाही हे तोवर मला कळालं होतं, असे अशोक सराफ म्हणाले.
तसेच म्हणाले, तिची अभिनयाबाबतची जिद्द, हट्ट याविषयी मी पुरता जाणून होतो. त्यामुळे तिचं माझ्यापेक्षा सरस ठरणं यामुळे मला वाईट वाटायचं नाही. उलट माझ्या मैत्रिणीसाठी मी आनंदी असायचो. रंजानासारखी त्यावेळी दुसरी नटी कुणीच नव्हती.
तिच्यासारखी तिच. इतरही अभिनेत्री नंतर आल्या ज्यांच्यासोबत मी काम केलं, आणि त्या उत्तम होत्या. पण रंजना सारखी रंजनाच असे अशोक सराफ म्हणाले. या आठवणी सांगताना अशोक सराफ यांच्या चेहऱ्यावर रंजना सारख्या एका खास मैत्रिणीला गमावल्याचं देखील दुःख दिसत होतं.
महत्वाच्या बातम्या
६ वीच्या मैत्रिणीसाठी केकेनं लिहीलं होतं ‘यारो दोस्ती’ गाणं अन् पुढे तिच…; केकेनं स्वत:च केला होता खुलासा
‘तो’ काळ आला आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी खालावली, अशोकमामा स्पष्टच बोलले
भाजपा प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानाने आखाती देशात भारताविरुद्ध संताप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..
शिवसेनेच्या पवारांना आस्मान दाखवण्याची भाजपची तयारी; फडणवीसांनी सांगीतला पुर्ण प्लॅन