नुकतीच अशोकमामांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये ते म्हणाले की, कौतुक होणं आणि चित्रपट हिट होणं यात खुप फरक आहे. ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना निखळ मनोरंजन हवं असतं. शहरातला प्रेक्षकही आज मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटात विभागला आहे. सैराट चित्रपटाच्या विषयात तसं काही नावीन्य नव्हतं पण त्याची ग्रामीण पार्श्वफूमी, मांडणी आणि धक्का देणारा शेवट तोही ग्रामीण भागातला, हे महत्वाचे गुण होते, असं ते म्हणाले.
मराठी प्रेक्षक चोंदखळ आहेत. तसं नसतं तर दादा कोंडके, निळू फुले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हे कधी चित्रपटात नायक होऊ शकले नसते. प्रेक्षकांना चेहऱ्यापेक्षा त्यांचं काम महत्वाचं वाटतं. बॉलिवूडवर बोलताना ते म्हणाले की, बॉलिवूडच्या दृष्टीनं मराठी माणूस हा नायकाच्या संकल्पनेत बसतच नाही.
भारतातील कित्येक घरात बाप तसा बेटा, असे आपल्याला पाहायला मिळते. पण अशोक सराफ जरी चित्रपट सृष्टीत असले, तरी त्यांचा मुलगा यापेक्षा पुर्णपणे विरुद्ध क्षेत्रात काम करतो. आज आम्ही अशोक सराफ यांचा मुलगा कोणत्या क्षेत्रात काम करतो हे सांगणार आहोत.
अशोक सराफ यांच्या पत्नीचे नाव निवेदिता जोशी सराफ आहे. त्यांनी देखील अभिनय क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. सध्या त्या झी मराठीवरील मालिका अग्ग बाई सुनबाईमध्ये काम आसावरीची भुमिका पार पाडत आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे दोघेही अभिनयात काम करत आहे, मात्र दाम्पत्याचा मुलगा यांच्यापेक्षा अपवाद आहे.
या दाम्पत्याच्या मुलाचे नाव आहे अनिकेत सराफ. अनिकेत हा लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रापासून लांब राहीला आहे. त्याने त्याचे आवडीचे करियर निवडले आहे. अनिकेत हा एक शेफ आहे. त्याला आधीपासूनच शेफ बनायचे होते. त्याला वेगवेगळे पदार्थ बनवायची खुप आवड होती.
अनिकेत लहानपणापासूनच आपली आई म्हणजेच निवेदिता यांना जेवण बनवताना पाहायचा. म्हणून त्याला जेवणाविषयी आवड निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने आपल्या आईवडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न जाता शेफ बनण्याचा निर्णय घेतला. तो एक उत्तम शेफ आहे यात काहीच शंका नाही.
महत्वाच्या बातम्या
नाटकात अशोक मामांसोबत घडला होता ‘हा’ भयानक प्रकार, तरी सुरु ठेवली तालीम; चिन्मयने सांगितला किस्सा
अशोक सराफ सैराटबद्दल म्हणाले, चित्रपटाच्या विषयात तसं नावीन्य नव्हतं पण…
लक्ष्यासोबत केलेल्या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा घसरला का? अशोक सराफ म्हणाले…
‘या’ पक्षाचा राज्यसभेसाठी मविआला पाठींबा जाहीर; शिवसेनेला दिलासा तर भाजपला झटका