Share

तापानं फणफणलो होतो, १०२ ताप होता, तरीही…अशोकमामांनी सांगितला ‘तो’ जुना किस्सा 

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते म्हणून ज्यांच्या नावाचा आजही उल्लेख केला जातो ते म्हणजे अशोक सराफ उर्फ अशोक मामा. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

१९७५ सालची गोष्ट आहे. डार्लिंग डार्लिंग या नाटकाचे प्रयोग करत होतो. नाटक करत असताना मी एका चित्रपटाचे चित्रीकरणही करत होतो. दहा दिवसात फक्त तीन तासांची झोप घेतली. रोज काम केलं पण अकराव्या दिवशी तापाने फणफणलो होतो. मला तब्बल १०२ ताप होता. अंगाला स्पर्श केल्यावर चटका बसतोय असं राजा गोसावी म्हणाले.

एवढं सगळं असतानाही मी ८ प्रयोग केले. काम करताना ताप जायचा आणि काम संपल्यावर ताप यायचा, असं ते यावेळी म्हणाले.

मराठी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे ७५ वर्षांचे झाले आहे. ४ जून रोजी त्यांनी आपला ७५ वाढदिवस साजरा केला आहे. ७५ व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर कलाकरांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

तसेच शिवाजी मंदिर येथे व्हॅक्युमक्लिनर नाटकाचा प्रयोग झाला. त्यावेळी त्यांचे नातेवाईक आणि सर्व लोक उपस्थित होते. तिथे असलेल्या चाहत्यांच्या गर्दीत अशोक सराफ यांचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी निवेदिता सराफ, निर्मिती सराफ या सुद्धा उपस्थित होत्या.

यावेळी निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या वाढदिवस साजरा करताना एक घोषणा केली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशोक सराफ यांचे मी बहुरुपी म्हणून एक पुस्तक येणार आहे, त्याबाबत निवेदिता सराफ यांनी घोषणा केली आहे.

पुस्तकाची घोषणा होताच चाहत्यांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. तसेच निवेदिता सराफ यांनी पुस्तक विक्रीतून जो निधी गोळा करण्यात येईल, त्याचे काय होणार हेही सांगितले आहे. निवेदिता सराफ म्हणाल्या, या पुस्तकातून जो निधी उपलब्ध होईल, तो गरजू कलाकारांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.

ज्या कलाकारांच्या हाताला काम नाही, तसेच ज्या कलाकारांना त्यांच्या आजारपणामुळे काम करता येत नाहीये. अशा कलाकारांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे, असे निवेदिता सराफ यांनी म्हटले आहे. अशोक सराफ यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांनीही त्यांचे कौतूक केले आहे.

अशोक सराफ यांच्या मी बहुरुपी पुस्तकात नक्की काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे म्हटले जात आहे की या पुस्कराच्या माध्यमातून अशोक सराफ यांच्या जीवन प्रवासात कोणकोणते क्षण आले, त्यांनी कोणकोणते चढउतार बघितले, याबाबत लिहिलेले असणार आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now