अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही दोघेही नावं मराठी चित्रपटसृष्टीत खुप गाजलेली नावं आहे. या दोन्ही कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीत महत्वाचं योगदान दिलं आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडपं आहे. ( ashok saraf ashok saraf romantic video viral)
चित्रपटांसोबतच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे जोडपं सुखात नांदतंय. अशात निवेदिता सराफ यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच व्हायरल होत आहे.
निवेदिता यांनी शेअर केलेली पोस्ट ही खास अशोक सराफ यांच्यासाठी आहे. निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्यासोबत एक सिनेमा केला होता. त्या सिनेमाचं नाव फेकाफेकी असे होते. या सिनेमातील एक जुना व्हिडिओ निवेदिता सराफ यांनी शेअर केला आहे.
हा व्हिडिओ निवेदिता सराफ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओच्या मागे सामने ये कौन आया दिल मैं हुई हलचल हे रोमँटिक गाणं लावण्यात आलेले आहे. Love story real life story असे या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ३४ हजारपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. तर ३ हजार ७०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहे. ब्युटीफुल कपल, जोडी असावी तर अशी अशा वेगवेगळ्या कमेंट लोकांनी यावर केल्या आहे.
दरम्यान, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यात १८ वर्षांचं अंतर आहे. या दोघांची भेट एका नाटकाच्या प्रयोगावेळी झाली. कालांतराने निवेदिता यांनीही चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हा अशोक सराफसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. नवरी मिळेल नवऱ्याला या सिनेमांत दोघांनी काम केलं. याच सिनेमात त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर दोघांनी लग्न केलं.
महत्वाच्या बातम्या-
आई मी सुट्टीवर येतोय…जवानाचे शब्द ठरले अखेरचे; नरळे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
हम साथ साथ है, म्हणत बीडमध्ये सात एचआयव्ही बाधित जोडप्यांचा शुभविवाह; जिल्हा प्रशासनाने केले कन्यादान
सच्चा शिवसैनिक, बेळगाव सीमाप्रश्नी आंदोलनात मोलाची भूमिका; जाणून घ्या ‘मावळा’ संजय पवारांबद्दल….