मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते म्हणून ज्यांच्या नावाचा आजही उल्लेख केला जातो ते म्हणजे अशोक सराफ उर्फ अशोक मामा. आज त्यांचा वाढदिवस आहे. नुकतीच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक हैराण करणारे किस्से सांगितले. यासोबत त्यांनी लक्ष्यावर टीका करणाऱ्या लोकांनाही सडेतोड उत्तर दिलं.
लक्ष्यावर आणि अशोकमामांवर एकेकाळी लोक टीका करत होते. त्याबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले की, लक्ष्मीकांत बेर्डेसोबत केलेल्या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा घसरला असं म्हणणाऱ्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही, असं अशोकमामा यावेळी म्हणाले.
राजा गोसावी, शरद तळवलकर अशा कलाकारांमुळे मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस होते. नंतर तमाशापटांचा काळ आला आणि आपली चित्रपटसृष्टी खालावली. इतकी की प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळतच नव्हते. अशावेळी आमच्या जोडीनं प्रेक्षकांना चित्रपटगृहात यायला भाग पाडलं.
मी त्या काळात दररोज चित्रीकरणात व्यस्त होतो. पण प्रेक्षक तरी मला किती पाहणार? त्यामुळं सुरूवातीच्या काळात दुय्यम भूमिका साकारणारा लक्ष्मीकांत प्रेक्षकांच्या आवडीच्या जोरावर नायक बनला. विनोदातल्या माझ्या टायमिंगशी लक्ष्मीकांतनं जुळवून घेतलं, म्हणून आमचे चित्रपट हिट झाले.
पुढे अशोकमामा म्हणाले की, कौतुक होणं आणि चित्रपट हिट होणं यात खुप फरक आहे. ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना निखळ मनोरंजन हवं असतं. शहरातला प्रेक्षकही आज मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटात विभागला आहे. सैराट चित्रपटाच्या विषयात तसं काही नावीन्य नव्हतं पण त्याची ग्रामीण पार्श्वफूमी, मांडणी आणि धक्का देणारा शेवट तोही ग्रामीण भागातला, हे महत्वाचे गुण होते.
दरम्यान, अशोक सराफ यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या वाढदिवसानिमित्त अशोक मामा भावूक झाले होते. अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला रुळावर आणण्यात महत्वाचं योगदान निभावलं आहे.
महत्वाच्या बातम्या
२० वर्षांपासून माय-लेक घेत होते एकमेकांचा शोध, ‘तो’ एक मेसेज अन् झाली दोघांची भेट; कहाणी ऐकून डोळे पाणावतील
‘या’ पक्षाचा राज्यसभेसाठी मविआला पाठींबा जाहीर; शिवसेनेला दिलासा तर भाजपला झटका
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही काळी जादू, मांत्रिकांच्या नादात पुण्यातील ७ मोठे व्यवसायिक झाले उद्ध्वस्त
केतकी चितळेच्या वकीलांनी राज्य सरकारवर केले गंभीर आरोप; राज्यपालांची भेट घेत केली ‘ही’ मोठी मागणी