मराठी चित्रपटसृष्टीतील महान कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अशोक सराफ. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले. त्यांच्या अभिनयाने त्यांनी एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला. त्यांचा नुकताच वेड सिनेमाही रिलिज झाला होता. त्यामध्ये त्यांनी केलेल्या अभिनयामुळेही ते चांगलेच चर्चेत होते.
आता अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा ५७ वाढदिवस झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे खुप प्रसिद्ध जोडपे आहे. त्यांना एक आदर्श जोडपं म्हणूनही पाहिलं जातं.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ त्यांच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. पण आम्ही तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी सांगणार आहोत. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे कोट्यवधी रुपयांचे मालक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सराफ यांच्याकडे ३७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यात बँड एंडोर्समेंटचाही समावेश आहे. तर निवेदिता सराफ यांच्याकडे १० कोटी रुपयांची संपत्ती आहे. नाटक, सिनेमे, मालिका आणि जाहिरातींमधून त्यांनी हे पैसे कमावलेले आहे.
अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकरल्या. त्यातील काही भूमिका या आजरामर झाल्या. ८० आणि ९० च्या दशकात तर अशोक सराफ यांना सर्वात जास्त मागणी होती. निवेदिता सराफ यांच्यासोबतही त्यांनी अनेक सिनेमे केले आहे.
निवेदिता सराफ यांनी १९७७ मध्ये अपनापन या चित्रपटातून या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी चित्रपटांसोबतच मराठी मालिका आणि नाटकांमध्येही काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
जिवंतपणी प्रेमविवाहाला विरोध, दोघांनी जीव दिल्यानंतर उघडले कुटुंबाचे डोळे; पुतळ्यांचं लावलं लग्न
कुस्ती महासंघाच्या ब्रिजभूषणसिंहवर लैंगिक छळाचे आरोप; ढसाढसा रडत विनेश फोगट म्हणाली…
सारा तेंडुलकर आणि शुबमन गिलचा लवकरच होणार साखरपुडा? सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल