भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि साक्षी मलिक यांनी भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघ (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. महासंघतील प्रशिक्षक महिला कुस्तीपटूंना त्रास देतात आणि फेडरेशनचे प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांसोबतही गैरवर्तन करतात. अशी तक्रार भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिने केली आहे.
नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे भारतीय कुस्ती महासंघाविरुद्धच्या निषेधादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंहने अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचे धाडस विनेश फोगट हिने केले होते. परंतु, डब्ल्यूएफआय अध्यक्षांच्या सांगण्यावरून तिला तिच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा दावा विनेश फोगटने केला.
” टोकियो ऑलिम्पिकमधील पराभवानंतर ब्रजभूषण शरण सिंह यांनी मला ‘खोटे नाणे’ म्हटले होते. WFI ने माझा मानसिक छळ केला. मी रोज आत्महत्या करण्याचा विचार करायचो. कुस्तीपटूला काही झाले तर त्याची जबाबदारी रेसलर फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष असेल.” असे देखील विनेश फोगट यावेळी म्हणाली आहे.
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या 10-20 प्रकरणांची आम्हाला माहिती आहे. यामध्ये अनेक प्रशिक्षक आणि रेफ्रींचा समावेश आहे. जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे धरू. कोणताही खेळाडू कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही. असेही निषेधा दरम्यान सांगण्यात आले आहे.
ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यावेळी म्हणाला की, “येथील मुली प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. आमच्या बहिणी-मुली इथे सुरक्षित नसतील तर आम्ही ते स्वीकारू शकत नाही. महासंघात बदल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
“नवीन कुस्तीपटूंचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी संपूर्ण फेडरेशन रद्द केले पाहिजे.” नवीन युनियन अस्तित्वात आली पाहिजे. खालच्या स्तरावरून घाण पसरली आहे. आम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी बोलून त्यांच्यासमोर पुरावे सादर करू. काही प्रकरणांची चौकशी व्हायला हवी. असे वक्तव्य ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने यावेळी केले आहे.
या पार्श्वभूमीवर WFI चे अध्यक्ष ब्रिज भूषण सिंह यांनी पीटीआयला सांगितले की, माझ्यावरील कुस्तीपटूंच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. लैंगिक छळाचा एकही गुन्हा सिद्ध झाला तर मी फासावर जाण्यास तयार आहे. मी WFI अध्यक्षपद सोडणार नाही, पण सीबीआय किंवा पोलिसांच्या चौकशीसाठी मी तयार आहे.माझ्याविरुद्धच्या या कटामागे एका उद्योगपतीचा हात आहे.
महत्वाच्या बातम्या
- IPL खेळण्याच्या तयारीत असलेल्या बुमराहला BCCI ने अचानक बोलावले टिम इंडीयात, समोर आले मोठे कारण
- मोठी बातमी! मुस्लिम मुलाशी लग्न केलेल्या अभिनेत्री राखी सावंतला अटक; लावले ‘हे’ गंभीर आरोप
- हिंदुत्ववादाचा डंका वाजवणाऱ्या फडणवीसांच्या पत्नीला हे शोभते का ? तो व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले