एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली. त्यावेळी ४० आमदार फूटले. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपशी (BJP) युती केली. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर राजकीय वातावरण तापले.
महाविकास आघाडी आणि शिंदे गट तसेच भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेत आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मोठ वक्तव्य केल आहे. त्यांनी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचे खुलेपणाने कौतुक केले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केले आहे. मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री राहिलो आहे. पण उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. उद्धव खरोखरच अद्भुत व्यक्ती आहेत. त्यांच्यासारखा मुख्यमंत्री होणे अवघड आहे.
तसेच, काही लोक म्हणतात की, काही लोक म्हणाले की काॅंग्रेस -राष्टवादीमुळे आम्ही शिवसेना सोडून चाललो आहे. त्यानंतर उद्धवजी राजीनामा देण्यासाठी जात होते. त्यावेळी मी त्यांना आम्ही आमची भूमिका स्पष्ट सांगितली होती. जर आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल. तर काॅंग्रेस पक्ष तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
यादरम्यान, महाविकास आघाडी मजबूत ठेवण्यासाठी तीन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत. तीनही पक्ष एकत्र सभा घेत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात वज्रमूठ सभा घेत आहेत. आगामी काळात देखील मोठ्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
कराडमधील युवकाने ड्रीम ११ मध्ये जिंकले १ कोटी अन् अख्ख्या गावाने सुरू केला राडा; पहा व्हिडीओ
‘…तर मी सुद्धा नावाचा गुलाबराव नाही; ठाकरेंची सभा संपताच गुलाबराव पाटलांनी दिले थेट ‘हे’ आव्हान