Share

“जेव्हा जेव्हा छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ आली, तेव्हा तेव्हा शिवसेनेने त्यांचा अपमानच केलाय”

शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी लवकरच ती घोषणा करण्यात येणार आहे. या जागेवर शिवसेना संभाजीराजे यांना पाठवेल अशी चर्चा होती. (ashish shelar criticize shivsena)

संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे, असे म्हटले जात आहे. भाजपच्या काही नेत्यांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहे. आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा छत्रपतींना आदर देण्याची वेळ येते, तेव्हा शिवसेना त्यांचा अपमानच करते, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते, तेव्हा प्रत्येकवेळी शिवसेनेने त्यांचा अपमान केला आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

एका गोष्टीचा खेद वाटतो, जेव्हा छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्यावेळी शिवसेनेने त्यांचा अपमान किंवा अनादर केला आहे. त्याचे कारण मला माहिती नाही. छत्रपतींच्या घराण्याचा जेवढा अनादर, अपमान शिवसेनेने केला आहे, तेवढा कोणीच केला नाही. म्हणून आपण बघितले की कधी विश्वविख्यात प्रवक्ते छत्रपतींच्या वंशजांच्या घराण्याचे पुरावे मागतात, असे शेलार यांनी म्हटले आहे.

तसेच ज्यावेळी छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते, तेव्हा पक्षाची अट घातली जाते. हे सुद्धा चित्र आपण बघितले आहे. भाजपने संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेत पाठवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा सन्मान केला, हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितले आहे, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेतील जागांचे गणित पाहिल्यास भाजप २ जागांवर आपले उमेदवार सहजपणे पाठवू शकतो. राज्यसभेवर शिवसेनाही आपला उमेदवार पाठवणार आहे. शिवसेना संभाजीराजेंना पाठवेल अशी चर्चा होती. पण त्यानंतर संजय पवार यांची निवड करण्यात आली आहे, त्यामुळे शिवसेना संभाजीराजेंना पाठिंबा देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
शेणाचा अनोखा फायदा! ओडिशातील गृहिणीने सुरू केला शेणापासून ‘हा’ व्यवसाय, कमावते बक्कळ पैसा
कान्स फेस्टिवलमधून परतताच बच्चन कुटुंबावर कोसळला दुखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीचा मृत्यु
कंगना राणौतचा ‘धाकड’ आपटला; अनेक ठिकाणी शो रद्द, कमाईच्या नावाखाली फक्त सन्नाटा….

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now