Share

”अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल..हारले..एक मासो आणि खंडी भर रस्सो!”

udhav thackeray

आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार असून प्राथमिक फेऱ्यांमधून आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसची मोठी पीछेहाट होताना दिसत आहे. दुसरीकडे भाजपानं उत्तर प्रदेशमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर या राज्यांमध्ये उमेदवार उभे केले होते.

मात्र शिवसेनेला गोव्यात अजून देखील खाते उघडता आले नाही. मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी ही निवडणुकी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र तसे प्रत्यक्षात दिसलेले नाहीये. यावरून भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेवर टोलेबाजी करण्यास सुरूवात केली आहे.

याचाच धागा पकडत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवनेवर निशाणा साधला आहे. ट्विट करत शेलार म्हणतात, ‘सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले…अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल.. हारले..“एक मासो आणि खंडी भर रस्सो!, असे म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/1501818171849805824?s=20&t=QZFsmu6dQz0FRs76T5EEmw

तसेच नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राणे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, गोवा और युपी में म्याव म्याव की आवाज नहीं सुनाई दीं भाई, व्हेरी सॅड, बहुत दुख हुआ, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, गोवा आणि युपीमध्ये म्याव म्यावचा आवाजच ऐकू नाही आला, भाई. व्हेरी सॅड, खुप दुख झाले, असं म्हणत नितेश राणेंनी टोला लगावला आहे. शिवसेनेला टोला लगावला आहे.

किरीट सोमय्यांनीही शिवसेनेला यावरून टोला लगावला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी आणि आदरणीय संजय राऊतजी गोव्यात शिवसेना कुठं आहे!!??” असं म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

दरम्यान, तर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आघाडी मारली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा शानदार विजयाकडे असून मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडमध्येही भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पंजाबमध्ये आप पक्ष बहुमताच्या दिशेने आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ जागांवर मतदान झाले आहे. पैकी सरकार स्थापनेसाठी २०२ एवढ्या बहुमताची गरज लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
राजकारणामुळे कुटुंबाने सोडले, कॉमेडियन म्हणून करिअरची सुरूवात, आता होणार पंजाबचे मुख्यमंत्री
ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा काँग्रेसचा आरोप, दिल्लीत कार्यकर्त्यांचे आंदोलन
युपीत ६० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला किती मते मिळाली? वाचून बसेल धक्का
काॅंग्रेसच्या पराभवानंतर प्रियांका गांधींनी दिला कार्यकर्त्यांना धीर; म्हणाल्या, निराश होण्याचे कारण नाही..

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now