“आज पुण्याच्या आधी मुंबई मेट्रो सुरू झाली असती पण पिता पुत्राच्या अहंकाराने हे होऊन दिले नाही”

माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप नेते नितेश राणेंविरोधात दिशा सालियनबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. शनिवारी नारायण राणे यांनी मालवणी पोलिस ठाण्यात हजेरी लावली.

या प्रकरणी तब्बल सलग 11 तास नारायण राणे यांची चौकशी करण्यात आली. याठिकाणी पोलिसांनी त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. यावेळी नारायण राणेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नाव घेतले. तर दुसरीकडे यावरून भाजप आक्रमक झाली आहे. “केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला राजकीय सूडबुद्धी म्हणणारे गप्प कसे?” असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

याबाबत भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेदरम्यान ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला राजकीय सूडबुद्धी म्हणणारे गप्प कसे? केंद्रीय मंत्र्याची 8 ते 10 तास चौकशी करता. न्यायालयाने जो गुन्हा गंभीर नाही असे म्हटले यावर एवढे तास चौकशी?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना शेलार म्हणाले, ‘केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला राजकीय सूडबुद्धी म्हणणारे गप्प कसे? केंद्रीय मंत्र्याची 8 ते 10 तास चौकशी करता. न्यायालयाने जो गुन्हा गंभीर नाही असे म्हटले यावर एवढे तास चौकशी? असंही शेलार यांनी म्हंटले आहे. याचबरोबर नवाब मलिक यांचे समर्थन राज्य सरकार करत आहे. हा बेशर्मपणा आहे, असे शेलार म्हणाले.

दरम्यान, दिशा सालियनबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने शनिवारी रात्री उशिरापर्यंत मालवणी पोलिस ठाण्यात राणे पिता – पुत्रांची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान नारायण राणे यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी याप्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांचे नाव घेत त्यांच्यावर आरोप केले.

दिशा सालियानची 8 जून आणि सुशांतची 13 जूनला हत्या झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला दोन वेळा फोन केला होता. तुम्ही सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका.’ तसंच, ‘मी हे जबाबात सांगूनही हे वाक्य माझ्या जबाबातून वगळलेले आहे, असे राणे म्हणाले.

तसेच पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, ‘मी वारंवार सांगतोय की, ते वाक्य टाका परंतु ते वगळलेले आहे. याचाच अर्थ ही आजची केस राजकीय हेतूने प्रेरित आहे. मुद्दाम आमच्यावर दबाव टाकण्याच प्रयत्न केला जात आहे.’, असा दावा नारायण राणेंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या
बाळासाहेबांनंतर हिंदूह्रदयसम्राट पदवी फडणवीसांना द्यावी, भाजपाची मागणी, शिवसेनेच्या भूमिकेकडे राज्याच लक्ष
श्रीलंकन खेळाडू दमलेत, डाव घोषित करा; द्विशतकाचा विचार न करता जड्डूने दाखवलं ‘Spirit Of Cricket’
‘कोण म्हणतं मी म्हातारा झालो.. मी अजून थकलेलो नाही, तुमची साथ असेपर्यंत हा गाडा सुरूच राहील’
आज-उद्या राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन