Share

राज्यसभेत भाजपला जिंकवून देण्याचा मास्टर प्लॅन ‘या’ माजी शिवसैनिकानेच आखला; एकेकाळी होता ठाकरेंचा विश्वासू

अखेर राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला, ज्यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिकांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत झाली, पण यात महाडिकच जिंकले. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी ठरल्याचे म्हटले जात आहे. (ashish kulkarni plan for bjp win)

महाविकास आघाडीकडे बहुमत असतानाही भाजपने तिसऱ्या जागेवर विजय मिळवला. या विजयामुळे देवेंद्र फडणवीस चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्यामुळेच भाजपला जिंकता आले असे म्हटले जात आहे. पण भाजपच्या या यशात मोलाचा वाटा एका माजी शिवसैनिकाचाही आहे.

आशिष कुलकर्णी असे या व्यक्तीचं नाव आहे. ते फडणवीस यांच्या कोअर टीमचे सदस्य आहे. ते सध्या भाजपच्या महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. त्यानंतर २००३ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते भाजपमध्ये आले होते.

शिवसेनेमध्ये असताना त्यांनी सुभाष देसाई यांच्या हाताखाली काम केले होते. जे आता राज्याच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री हे पद सांभाळत आहे. ते शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे. आता त्यांनीच शिवसेनेच्या संजय पवारांना पराभूत करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल बोंडे यांना आम्ही सर्वाधिक ४८ मते दिली. तर दुसरी पसंती तिसरे उमेदवार असलेल्या महाडिकांना दिली. हे सर्व आशिष कुलकर्णी यांच्या योजनेनुसार घडले. ज्याला देवेंद्र फडणवीस अंतिम रुप दिले, असे एका भाजप नेत्याने म्हटले आहे.

तसेच गोयल आणि बोंडे यांना आमदारांनी ४८-४८ मतं दिली, तर ९ भाजप आणि ८ अपक्ष आमदारांच्या मदतीने धनंजय महाडिकांना विजय मिळवून दिला आहे. या रणनितीत आशिष कुलकर्णी महत्वाचा भाग होते. त्यामुळे भाजपच्या या विजयात फडणवीसांसोबत एका माजी शिवसैनिकानेही महत्वाची भूमिका साकारल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
“..त्यावेळी मी संजय दत्तच्या झिंज्या उपटल्या आणि खाड खाड कानाखाली वाजवल्या”
भर बैठकीतच भरणे अन् राऊतांमध्ये जुंपली; आधी खाली बसा म्हणत राष्ट्रवादीच्या भरणेंनी राऊतांना झापले
‘असं करून तुम्ही पवारांची प्रतिष्ठा कमी करताय’, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना झापले; वाचा नेमकं प्रकरण काय..

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now