Share

ज्ञानवापी ही मशिद होती आणि शेवटपर्यंत मशिदच राहील; कोर्टाच्या आदेशानंतर औवेसी संतापले

वाराणसीतील ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केल्याने देशभरातील एकच खळबळ उडाली आहे. येथील न्यायालयाने तात्काळ जिल्हा प्रशासनाला ज्ञानवापी मशिद संकुलाचा तो भाग सील करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी देशातील वेगवेगळे नेते प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. (asduddin owaisni on dyanwapi shivling)

आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या दाव्यानंतर आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ज्ञानवापीची तुलना बाबरी प्रकरणाशी केली. त्यांनी लिहिले, ‘हे बाबरी मशिदी डिसेंबर १९४९ ची पुनरावृत्ती आहे. हा आदेश स्वतःच मशिदीचे धार्मिक स्वरूप बदलतो. हे १९९१ च्या कायद्याचे उल्लंघन आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

मला जी भिती वाटत होती ती भिती खरी ठरली आहे. या प्रकरणाची सुनावणी होत असताना आज कोर्टाने एवढ्या लवकर जागा सील का केली? १९९१ मध्ये हायकोर्टाने अशा प्रकारच्या मागणीला स्थगिती दिली होती. तो कायदा संपला का? ज्ञानवापी ही मशीद होती आणि शेवटपर्यंत मशीदच राहील, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

न्यायालयाचा आदेश संसदेने १९९१ मध्ये संमत केलेल्या कायद्याच्या विरोधात आहे. कारण आजच्या आदेशाने मशिदीचे स्वरूप बदलले आहे, जो कायदा बनवण्यात आला होता त्यात कोणत्याही धार्मिक स्थळाचे स्वरूप बदलू नये असे दिले होते. न्यायालयाचा आदेश बाबरी मशिद-राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे उल्लंघन करतोय, असे ओवेसींनी म्हटले आहे.

ओवेसी म्हणाले की, बाबरी प्रकरणात मी श्रद्धेच्या आधारावर दिलेला निर्णय असल्याचे सांगितले होते आणि आता इतर मुद्दे उघडतील आणि ते उघडले आहेत. संघाच्या नेत्यांच्या वेबसाईटवर जा, ते म्हणतात की, एकेकाळी सर्व मंदिरे होती, आता तोच मुद्दा रोज उपस्थित होईल.

दरम्यान, वाराणसीतील हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितले की, ज्ञानवापी संकुलात सापडलेले शिवलिंग सुरक्षित करण्याच्या मागणीवर सुनावणी करताना दिवाणी न्यायाधीश रवी कुमार दिवाकर म्हणाले की, न्यायालयाच्या कामकाजादरम्यान मशिदीच्या आवारात शिवलिंगाची भेट हा महत्त्वाचा पुरावा. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे तो भाग सील करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांवर टिका करताना दिपाली सय्यदची जीभ घसरली; म्हणाली, टरबुज्या, भोंग्या….
अखेर ताजमहालच्या तळघरातील २२ बंद खोल्यांचे फोटो जारी, ASI ने २०२२ मध्ये ‘या’ कारणास्तव उघडले लॉक
हनुमानाबद्दल प्रश्न विचारताच नवनीत राणांची झाली पंचाईत, VIDEO तुफान व्हायरल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now