कर्नाटकातील एका महाविद्यालयातून हिजाबवरून सुरू झालेल्या वादावर राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पुन्हा एकदा एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाब वादावर ट्विट केले आहे. एक व्हिडिओ ट्विट करताना ओवेसींनी कॅप्शनमध्ये लिहिले की, इंशाअल्लाह एकदिवस हिजाबी पंतप्रधान बनेल. (asduddin owaisi on prime minister)
ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये ओवेसी म्हणत आहेत की, ‘आम्ही आमच्या मुलींना शुभेच्छा देतो’ इंशाअल्लाह, जर तिने म्हटले की मम्मी मी हिजाब घालेन. तर आईवडिल म्हणतील, बेटा घाल, आम्ही बघू तुला कोण अडवते. हिजाब घालून, नकाब कॉलेजात जाईल, कलेक्टरही बनेल, बिझनेस मॅनही बनेल, एसडीएमही बनेल आणि या देशात एक दिवस मुलगी हिजाब घालून पंतप्रधान बनेल.
यापूर्वी असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाब वादात पुट्टास्वामींच्या निकालाचा संदर्भ दिला होता. ओवेसी म्हणाले होते, भारतीय राज्यघटनेने तुम्हाला चादर, नकाब किंवा हिजाब घालण्याचा अधिकार दिला आहे… पुट्टास्वामींचा निकाल तुम्हाला हे करण्याची परवानगी देतो. ही आपली ओळख आहे.
तसेच ज्या मुलीने त्या मुलांना उत्तर दिले त्या मुलीला मी सलाम करतो, तिला घाबरण्याची गरज नाही, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील एका निवडणूक सभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले होते की, कोणतीही मुस्लिम महिला कोणत्याही भीतीशिवाय हिजाब घालू शकते.
भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी ओवेसी यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. राकेश त्रिपाठी म्हणाले की, असदुद्दीन ओवेसी यांची ही चिखलफेक सुरूच राहणार आहे. एकीकडे त्यांना मुस्लिम महिलांना बुरख्यात ठेवायचे आहे, ही त्यांची कुरघोडी, संकुचित आणि कट्टरतावादी विचारसरणी आहे, पण आता मुस्लिम महिला आणि मुली पुढे सरसावत स्वावलंबी होत आहेत.
दरम्यान, देशात हिजाबचा वाद कर्नाटकातील उडुपी येथील विद्यापीठातून सुरू झाला. कॉलेजमध्ये सहा विद्यार्थिनी हिजाब घालून वर्गात आल्या होत्या. यानंतर अशीच प्रकरणे कुंदापूर आणि बिंदूर येथील काही महाविद्यालयांमध्येही समोर आली. राज्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून महाविद्यालय किंवा क्लासेसमध्ये जाऊ दिले जात नाहीये.
महत्वाच्या बातम्या-
हिजाबप्रकरणी ठाम भूमिका घेतल्याने जीवे मारण्याच्या धमक्या; भाजपा आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
..आणि मिठी मारून दीर भावजयीने भररस्त्यात सोडला जीव, सत्य समोर आल्यानंतर पोलिसही हादरले
कंगना राणावत ‘गेहराइयां’ चित्रपटाला म्हणाली ‘कचरा’, पोर्नोग्राफी चित्रपटांशी केली तुलना