उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकीचा गोंधळ संपला आहे. या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले आहे. या राज्यंमध्ये पंजाब वगळता सगळीकडे भाजप सरकारचे आले आहे. त्यामुळे भाजपचे विरोक्षी पक्षांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली आहे. (asduddin owaisi on bsp)
अनेक विरोधी पक्षनेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. असे असताना आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही भाजपच्या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील जनतेने भाजपला पुन्हा निवडून दिले, आम्ही त्यांचा आदर करतो.
असदुद्दीन ओवेसी यांनी यूपी विधानसभा निवडणुकीत १०० उमेदवार उभे केले होते. पण उत्तर प्रदेशातील जनतेचा एआयएमआयएमवर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांचा एकही उमेदवार निवडून नाही आला. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर प्रदेशातील लोकांनी भाजपला पुन्हा निवडून दिले, आम्ही त्याचा आदर करतो. निर्णय आमच्या बाजूने आला नसला तरी आम्ही आणखी मेहनत करू. आम्ही आता गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या स्थानिक निवडणुका लढवणार आहेत. AIMIM चे ध्येय राजकीय नेतृत्व बनणे आहे, असे ओवेसी म्हणाले आहे.
या निवडणूकीत एमआयएमसोबतच बहुजन समाज पार्टीला एकही जागा जिंकता आली नाही. यावरही ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बसपा टिकली पाहिजे, ही पार्टी विसर्जित झाल्यास लोकशाहीसाठी दु:खद दिवस असेल, असे म्हणत ओवेसी यांनी काळजी व्यक्त केली आहे.
जर बसपा विसर्जित झाली, तर तो दिवस लोकशाहीसाठी दु:खद दिवस असेल. बसपाची भारतीय राजकारणात मोठी भूमिका राहिली आहे. मला आशा आहे की हा पक्ष पुन्हा भरारी घेईन. आजच्या निकालावरुन बसपा कमजोर झाल्याचे दिसते, पण बसपा टिकणं गरजेचं आहे, असे ओवेसी म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
जडेजाने मोडला कपिल देव यांचा ‘हा’ विक्रम, ICC च्या ऑल राऊंडरच्या पंगतीत मिळवले पहिले स्थान
तब्बल 342 मते मिळवणारे गोविंद गोवेंकर ठरले सर्वाधिक मतं घेणारे शिवसेना उमेदवार
शिवसेनेला नोटापेक्षा कमी मतं का मिळाली? संजय राऊत म्हणाले, भाजपने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या..