Share

ओवेसींच्या गोळीबारावर पत्नीला विश्वास नाही; म्हणाली, डिनर डेटना न्यायचं नाही असं सांगा, खोटं का बोलताय

एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी गुरुवारी रात्री त्यांच्या पत्नीला जेवायला घेऊन जाणार होते. त्यानंतर संध्याकाळी उशिरा मेरठहून परतत असताना त्यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला. हल्ल्यानंतर ओवेसी यांनी पत्नीला या प्रकरणाची माहिती दिली. (asaduddin wife on owaisi attack)

ओवेसींनी आपल्या पत्नीला गोळीबाराबाबत सांगितलं तरीला विश्वास बसला नाही. पत्नी म्हणाली की, तुम्हाला डिनर डेटला न्यायचे नाही, हे सांगा ना. त्यासाठी तुम्ही नवीन गोष्ट का रचताय? त्यानंतर ओवेसी यांनी पत्नीला टीव्ही पाहण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्या पत्नीला या हल्ल्याबाबत माहिती मिळाली.

इंडियन एक्सप्रेस कॉलम दिल्ली कॉन्फिडेन्शिअलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ओवेसी यांची पत्नी आणि मुलगी त्यावेळी दिल्लीत होत्या. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी प्रचारात व्यस्त होते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, त्यांनी आपल्या पत्नीला वचन दिले होते की निवडणूक प्रचारातून परत आल्यानंतर ते त्यांना रात्री जेवायला घेऊन जाईल.

हल्ल्यानंतर ते घरी परतले तेव्हा त्यांना त्यांची पत्नी जेवायला जाण्यासाठी तयार असल्याचे दिसले. गोळीबारानंतर गोंधळलेल्या ओवेसींनी त्यांना गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली. रिपोर्टनुसार, ओवेसी यांच्या पत्नीला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. बायकोच्या बोलणे खाऊ नये म्हणून ओवेसी नवीन काहीतरी कथा रचत आहे, असे त्यांना वाटले. रिपोर्टनुसार, ओवेसी यांच्या पत्नीने सांगितले की, ते नवीन स्टोरी रचत आहे.

गोळीबाराच्या घटनेवर पत्नीचा विश्वास बसत नसल्याचे पाहून ओवेसींनी तिला टीव्ही चालू करून पाहण्यास सांगितले. दरम्यान, ओवेसीच्या मुलीने तिच्या आईला फोन करून गोळीबाराच्या घटनेबद्दल आणि तिच्या वडिलांबद्दल विचारले. तेव्हा ओवेसी यांच्या पत्नीच्या लक्षात आले की ओवेसी खरे बोलत आहेत.

दरम्यान, गुरूवारी संध्याकाळी मेरठहून परतत असताना त्यांच्या गाडीवर ४ राउंड फायरिंग करण्यात आली. चिजारसी टोल प्लाझाजवळ हा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यातील दोन आरोपींना गुरुवारीच यूपी पोलिसांनी अटक केली होती, त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
जेलमध्ये टाकलं तरी मस्ती गेली नाही, सुटकेनंतर थेरगाव क्वीनचा मित्रांसोबत पुन्हा धिंगाना; व्हिडिओ व्हायरल
कोरेगाव भीमा प्रकरणी आता विश्वास नांगरे पाटलांची होणार चौकशी; परमबीर सिंग, रश्मी शुक्लानंतर पाटलांची बारी
शेतकऱ्याचा नाद नाय! ६ लाख खर्च करुन घराच्या छतावर लावले ३३ वर्षे जूने ट्रॅक्टर

राजकारण

Join WhatsApp

Join Now