Share

धक्कादायक! असदुद्दीन ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी समर्थकांकडून 101 बकऱ्यांचा बळी; वाचा संपूर्ण प्रकरण 

Asaduddin Owaisi

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (Uttar Pradesh Assembly Elections) कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi)  यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता त्यांनी ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करण्याचे खळबळजनक कारण उघड केले आहे. पोलिसांनी सांगितले की, गोळीबाराचा आरोपी सचिन आणि शुभम यांनी सांगितले की, असदुद्दीन ओवेसी यांनी 2013-14 मध्ये राम मंदिराबाबत वक्तव्य केले होते, त्यामुळे त्यांना दुखापत झाली होती.

त्यामुळेच त्यांनी ओवेसींच्या ताफ्यावर हल्ला केला. तर दुसरीकडे या घटणेबाबत बोलताना बोलताना ओवेसी म्हणाले, “मी किथौध, मेरठ येथील एका मतदान कार्यक्रमानंतर दिल्लीला निघालो होतो. छाजरसी टोल प्लाझाजवळ दोन लोकांनी माझ्या वाहनावर सुमारे तीन ते चार गोळ्या झाडल्या. ते एकूण ३-४ लोक होते. माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले, त्यानंतर मी तेथून दुसऱ्या वाहनाने निघालो.”

दरम्यान, “या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी. या घटनेमागे कुणाचा हात होता, याचा तपास करावा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकारने याची चौकशी करावी. एका खासदारावर उघडपणे गोळीबार होणं, कसं शक्य आहे?,” असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.

तर दुसरीकडे ओवेसी यांच्या काही समर्थकांनी त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. त्यासाठी 101 बकऱ्यांचा बळीही देण्यात आला आहे. हैदराबादच्या एका व्यापाऱ्याने रविवारी हा कार्यक्रम केला. विशेष बाब म्हणजे, या कार्यक्रमासाठी एआयएमआयएमचे नेते अहमद बलाला उपस्थित होते.

दरम्यान, या घटनेनंतर ओवेसी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांचा ताफा पिलखुआ येथे पोहोचला तेव्हा मोठा आवाज झाला. त्यानंतर चालकाने गाडीवर गोळीबार झाल्याचे सांगितले. यानंतर पुन्हा तीन-चार वेळा गोळीबाराचा आवाज आला. आम्ही गाडी वेगाने पळवली, त्यादरम्यान आमच्या वाहनाच्या चालकाने हल्लेखोराला धडक दिली. हल्लेखोरांपैकी एकाने लाल रंगाचे जॅकेट घातले होते.

महत्त्वाच्या बातम्या
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बाळाला स्तनपान देताना कारने चिरडले; वाचून तुम्हीही ढसाढसा रडाल
भारताला वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या रशीदच्या यशामागे आहे ‘ही’ व्यक्ती; घेतलेले कष्ट वाचून डोळ्यात पाणी येईल
नेहरूंनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी गोव्याला १५ वर्षे गुलामगिरीत सोडलं: मोदी
मार्क झुकरबर्गला मोठा धक्का, फेसबूकचे एका दिवसात झाले तब्बल एवढ्या बिलीयन डॉलरचे नुकसान

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now